चमचमत्या बंगल्याला गांजाची शेती, ३.५ लाखांची गांजा लागवड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 22:06 IST2018-10-20T22:05:57+5:302018-10-20T22:06:31+5:30
ते बंगल्यात राहतात, अलिशान गाड्या घेऊन फिरतात, काम धंदा काय करतात हा कालपर्यंत मोठा संशोधनाचा विषय होता, परंतु आज त्याचा शोध गुन्हा अन्वेशण विभागाने लावला आहे.

चमचमत्या बंगल्याला गांजाची शेती, ३.५ लाखांची गांजा लागवड जप्त
पणजी - ते बंगल्यात राहतात, अलिशान गाड्या घेऊन फिरतात, काम धंदा काय करतात हा कालपर्यंत मोठा संशोधनाचा विषय होता, परंतु आज त्याचा शोध गुन्हा अन्वेशण विभागाने लावला आहे. बंगल्याच्या बाहेर असलेल्या उद्यानातच त्याने गांजाचा मळा पिकविला होता. पोलिसांनी कारवाई कारवाई करून पिळर्ण - पर्वरी येथील हा प्रकार उघडकीस आणला.
आपल्या बंगल्या बाहेरच्या गार्डनमध्येच गांजाची लागवड करणाºया ख्रिस्तोफर मायकल पेटिन्सन नामक २० वर्षीय युवकाला गोवा पोलिसाच्या गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केली आहे. लागवड केलेला ३.५ लाख रुपयांचा गांजाही जप्त केला आहे. हा गांजा तो व्यावसायिक तत्वावर पिकवित होता. संशयिताचे वडिल ब्रिटिश नागरिक आहेत आणि गोव्यातील महिलेशी त्याचा विवाह झाला होता. संशयित ख्रिस्तोफरचा जन्मही गोव्यातच झाला.
ख्रिस्तोफर अंमली पदार्थांचा व्यवहार करीत असल्याचा संशय पोलिसांना होता. तशी माहितीही त्यांना मिळाली होती. योग्यवेळ साधून निरीक्षक राजन निगळ््ये आणि राहूल परब यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करून पुराव्यांसह संशयिताला अटक करण्यात आली. संशयिताने आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. दरम्यान गांजा लागवडीच्या घटना राज्यात बºयाच उघडकीस येवू लागल्या आहेत. यापूर्वी कळंगूट येथे छापा टाकून क्राईम ब्रँचने एका फ्लॅटमध्ये करण्यात आलेली गांजा लागवड उघडकीस आणली होती.