सभापतिपदी गणेश गावकरांची निवड निश्चित; भाजपाचे संख्याबळ पाहता निवडणूक एकतर्फीच होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:37 IST2025-09-25T12:37:19+5:302025-09-25T12:37:42+5:30
विधानसभेतील संख्याबळ पाहता गणेश गावकर यांचा विजय निश्चित आहे.

सभापतिपदी गणेश गावकरांची निवड निश्चित; भाजपाचे संख्याबळ पाहता निवडणूक एकतर्फीच होणार
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: निवडण्यासाठी आज, गुरुवारी सकाळी ११.३० वाजता विधानसभेचे खास अधिवेशन होणार आहे. या पदासाठी सत्ताधारी भाजप व मित्रपक्षांतर्फे आमदार गणेश गावकर नवीन सभापती तर विरोधकांतर्फे काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. विधानसभेतील संख्याबळ पाहता गणेश गावकर यांचा विजय निश्चित आहे.
दरम्यान, गणेश गावकर यांनी पर्यटन विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. रमेश तवडकर सभापतिपदाचा राजीनामा देऊन मंत्री बनल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काल २४ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत मुदत होती. परंतु या मुदतीत दोनच अर्ज आले. चाळीस सदस्यीय विधानसभेत भाजप व मित्रपक्ष तसेच अपक्ष मिळून सत्ताधारी गटात ३३ तर विरोधी बाकावर काँग्रेसचे तीन, आपचे दोन व गोवा फॉरवर्ड आणि आरजीचा एक मिळून सात आमदार आहेत. हे संख्याबळ पाहता ही निवडणूक एकतर्फीच होणार आहे.
दरम्यान, सभापतीची निवडणूक पद लढवताना कोणतेही लाभाचे उमेदवाराकडे असता कामा नये, त्यामुळे गावकर यांना जीटीडीसी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. 'लोकमत'शी बोलताना त्यांनी आपण मंगळवारीच या पदाचा राजीनामा सादर केल्याचे सांगितले. त्यामुळे या महामंडळावरही आता नवीन अध्यक्ष नेमावा लागणार आहे.
आज विधानसभेत दोन अभिनंदनाचे ठराव येणार असून त्यात उपराष्ट्रपतिपदी निवड झाल्याबद्दल सी. पी. राधाकृष्णन, जीएसटी दर सुधारणा आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले जाईल. शिवाय म्हादईच्या बाबतीत अभ्यासार्थ सभागृह समिती तसेच अन्य समित्यांची फेररचना केली जाईल.