मित्रांसमवेत गोव्यातील कोलवा किनाऱ्यावर पोहताना चौदा वर्षीय मुलगा बुडाला, शाेध सुरू 

By सूरज.नाईकपवार | Updated: November 3, 2023 17:16 IST2023-11-03T17:15:40+5:302023-11-03T17:16:19+5:30

मित्रांसमवेत गोव्यातील कोलवा किनाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेला एक १४ वर्षीय मुलगा बुडाला.

Fourteen-year-old boy drowns while swimming at Colwa beach in Goa with friends, investigation underway | मित्रांसमवेत गोव्यातील कोलवा किनाऱ्यावर पोहताना चौदा वर्षीय मुलगा बुडाला, शाेध सुरू 

मित्रांसमवेत गोव्यातील कोलवा किनाऱ्यावर पोहताना चौदा वर्षीय मुलगा बुडाला, शाेध सुरू 

मडगाव : मित्रांसमवेत गोव्यातील कोलवा किनाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेला एक १४ वर्षीय मुलगा बुडाला. वेलेंतिनो पिंटो असे त्याचे नाव तो याच भागातील फॉर्थवॉर्ड कोलवा येथील आहे. आज शुक्रवारी  दुपारी येथील बॉलिवूड हॉटेल नजिक ही घटना घडली. बुडालेल्या सदया शोध चालू आहे. उशिरापर्यंत तो सापडला नव्हता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चारजण पोहण्यासाठी गेले होते. वेलेंतिनो हा सुमद्राच्या जोरदार लाटेत गंटगळया खाउ लागला. व तो नंतर बुडला. त्याच्या समवेत असलेल्या मित्रांनी तो बुडत असल्याचे बघितल्यानंतर मदतीसाठी जोराजोराने आरडाओरडाही केला. मात्र त्यापुर्वीच तो पाण्यात दिसेनासा झाला.

यासंबधी नंतर बेतुल सागरी किनारा पोलिसांना कळविण्यात आले. तेथील पोलिसांनी नंतर कोलवा पोलिस ठाण्यात संपर्क साधला व झालेल्या घटनेची माहिती त्या पोलिसांना दिली. कोलवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक थॅरन डिकॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपा देईकर व अन्य पोलिसांनी नंतर घटनास्थळी धावा घेतली.

Web Title: Fourteen-year-old boy drowns while swimming at Colwa beach in Goa with friends, investigation underway