शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना तूर्त अटक नाही, एसआयटीची न्यायालयाला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2017 1:47 PM

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना प्रफुल्ल हेदे खाण लीज प्रकरणात तूर्त अटक करण्याचा  इरादा नाही, परंतु जेव्हा अटक करण्याचा निर्णय होईल तेव्हा दोन दिवस अगोदर त्यांना त्याची माहिती देण्यात येईल, असे खाण घोटाळ्याचा तपास करणाऱ्या विशेष तपास थकाकडून (एसआयटी) न्यायालयात सांगणयात आले. 

पणजी - माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना प्रफुल्ल हेदे खाण लीज प्रकरणात तूर्त अटक करण्याचा  इरादा नाही, परंतु जेव्हा अटक करण्याचा निर्णय होईल तेव्हा दोन दिवस अगोदर त्यांना त्याची माहिती देण्यात येईल, असे खाण घोटाळ्याचा तपास करणाऱ्या विशेष तपास थकाकडून (एसआयटी) न्यायालयात सांगणयात आले.  माजी मुख्यमंत्री कामत यांनी पणजी सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचीकेवरील सुनावणीदरम्यान एसआयटीकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. या प्रतिज्ञापत्रात कामत यांना प्रफुल्ल हेदे प्रकरणात तूर्त तरी अटक करणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कामत यांची अटकपूर्व जामीन याचिका निकालात काढण्यात आली आहे. एसआयटीला जेव्हा कामत यांच्या अटकेची गरज भासेल तेव्हा एसआयटीकडून त्यांना 48 तास अगोदर कळविण्यात येणार असल्यामुळे अटकपूर्व जामीनसाठी न्यायालयात जाण्यासाठी कामत मोकळे असतील. 

एसआयटीच्या या नवीन भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात असले तरी त्यातही डावपेच असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. काही अधिकाऱ्यांच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यापुढे कलम सीआरपीसी कलम 164 अंतर्गत जबानी नोंदविण्यात आली असून सर्वच जणांच्या जबानीच्या प्रती एसआयटीला अद्याप मिळालेल्या नाहीत. शिवाय इतर पुरावेही जमविण्यासाठी एसआयटीला वेळ हवा आहे. त्यामुळेच एसआयटीकडून ही भूमिका घेण्यात आल्याची चर्चा आहे. 

दरम्यान खाणलीजधारक प्रफुल्ल हेदे यांनी आपल्याला मंजूर करण्यात आलेला कंडोनेशन डिले हा पूर्णपणे कायदेशीर आणि 1993 मधील असल्याचे विशेष पत्रकार परिषद घेऊन सांगितले. आपल्या विरुद्ध नोंदविण्यात आलेला गुन्हा हा बेकायदेशीर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

 

 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर