FORMER DEPUTY CM VIJAY SARDESAI DEMANDED CBI ENQUIRY INTO POTHOLE RIDDEN ROADS IN GOA | रस्ता घोटाळ्याची चौकशी सीबीआयद्वारे होण्याची गरज

रस्ता घोटाळ्याची चौकशी सीबीआयद्वारे होण्याची गरज

मडगाव: सहा महिन्यापूर्वी ज्या रस्त्यावर 200 कोटी रुपये खर्च केले ते रस्ते पहिल्याच पावसात वाहून गेले आहेत हे पहाता गोव्यातील हा रस्ता घोटाळा बिहारातील चारा घोटाळ्य़ापेक्षा जास्त प्रखर असून या घोटाळ्याची सीबीआयद्वारे चौकशी करण्याची गरज गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.


फातोर्डा येथील सेंट ङोवियर्स चॅपेलच्या स्थलांतराची पहाणी करण्यासाठी मडगावच्या नगरसेवकांबरोबर आले असता सरदेसाई यांनी गोव्यातील रस्त्यांच्या दुर्दशेबद्दल खंत व्यक्त केली. ते म्हणाले, राज्यातील रस्ते चतुर्थीपूर्वी व्यवस्थित केले जाईल असे आश्र्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी आम्हाला विधानसभेत दिले होते. आता ते मे 2020 र्पयत रस्ते ठीक होतील असे सांगतात. गोवेकरांची चतुर्थी खड्डय़ात गेली. आता दसरा, दिवाळी, ािसमस आणि नवीन वर्षही खड्डय़ात जावे असे सरकारला वाटते का असा प्रश्र्न सरदेसाई यांनी केला. एकाबाजुने विदेशात व्हायब्रंट गोवा योजनेखाली जाऊन पर्यटकांना गोव्यात बोलावता आणि दुस:याबाजूने त्यांना या रस्त्यावरील व्हायब्रेशनला सामोरे जाण्यास भाग पाडता. अशाने गोव्यात पर्यटक का येतील असा सवाल त्यांनी केला.


काही दिवसांपूर्वी मडगावच्या कचरा समस्येबद्दल पालिकेला मंत्री मायकल लोबो यांनी दोषी धरले होते त्याबद्दल बोलताना  सरदेसाई म्हणाले, मडगावातील कच:यावर बायोमेथानेशन पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी दोन प्रकल्प सुरु करावेत यासाठी मडगाव पालिकेने एका महिन्यापूर्वी सरकारला प्रस्ताव दिला होता. ही पद्धती प्रधानमंत्र्यांच्या मतदारसंघात यशस्वीपणो राबविली गेली आहे. मात्र हीच पद्धती मडगावात राबविण्यासाठी मायकल लोबो परवानगी का देत नाहीत असा सवाल त्यांनी केला. मडगाव हागणदारी मुक्त असल्याचा दावा जो केला जात आहे तोही हास्यास्पद असून कित्येक बांधकाम प्रकल्पाकडे कामगार उघडय़ावरच शौच करत आहेत. मात्र प्रशासनाने मडगावचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांच्यावर दबाव आणून त्यांच्याकडून शहर हागणदारी मुक्त झाल्याचे प्रमाणपत्र घेतले आहे असा आरोप त्यांनी केला.


यावेळी मडगावच्या नगराध्यक्ष बबिता प्रभूदेसाई तसेच अन्य नगरसेवक त्यांच्याबरोबर उपस्थित होते. फातोडर्य़ात झालेल्या डेंग्यूच्या प्रादरुभावासंदर्भात कोणती उपाययोजना घेणो शक्य आहे याबद्दल त्यांनी शनिवारी मडगाव आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ. अंजु खरंगटे यांच्याशी चर्चा केली. डास निमरुलनासाठी आरोग्य केंद्राच्या अधिका:यांबरोबर मडगावचे नगरसेवक लोकांर्पयत जाऊन जागृती करतील असे सरदेसाई यांनी यावेळी सांगितले.
 

Web Title: FORMER DEPUTY CM VIJAY SARDESAI DEMANDED CBI ENQUIRY INTO POTHOLE RIDDEN ROADS IN GOA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.