शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

गोव्यातून जाणारी मासळी कारवार चेक नाक्यावर अडवली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 3:48 PM

गोव्यात इन्सुलेटेड वाहनांतून मासळीची वाहतूक करण्याची सक्ती केल्यामुळे त्याचे विपरित परिणाम जवळपासच्या कारवार जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायावर झाला आहे.

मडगाव: गोव्यात इन्सुलेटेड वाहनांतून मासळीची वाहतूक करण्याची सक्ती केल्यामुळे त्याचे विपरित परिणाम जवळपासच्या कारवार जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायावर झाला आहे. गोव्यातील या अघोषित बंदीला आव्हान देण्यासाठी शनिवारी कारवारच्या मत्स्योद्योजकांनी माजाळी येथे गोव्यातून मासळी घेऊन गेलेली वाहने अडवून धरली. जोपर्यंत गोव्यात कारवारचे मासे आणायला देत नाहीत तोपर्यंत गोव्यातले मासेही कारवारात आणू देणार नाहीत, असा इशारा या आंदोलकांनी दिला. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गोवा सरकारला एक आठवड्याची मुदत यावेळी देण्यात आली.शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कारवारच्या उद्योजकांनी ही वाहने अडविली. यातील बहुतेक वाहने कर्नाटक रजिस्ट्रेशनची होती आणि गोव्यातून मासळी घेऊन ती कारवारला जात होती. गोव्यातील पोळे चेकनाक्यातून वाहने सुटल्यावर लगेच माजाळीच्या चेक पोस्टवर ती अडविण्यात आली. यावेळी कारवार जिल्ह्याचे जिल्हा पंचायत सदस्य सदानंद मेथा यांनी गोवा सरकारने आमच्या वाहनांवर बंदी घातल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. आमचे आंदोलन यापुढेही चालू राहील असे सांगितले.गोव्याबाहेरून आणले जाणारे मासे जर फॉर्मेलिन घालून आणले जात असतील तर ते आंध्र प्रदेश व केरळ या दूरच्या राज्यातून आणण्याची शक्यता आहे. कारवार गोव्यापासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर आहे. एवढय़ा कमी अंतरावर मासळी वाहून नेताना आम्ही फॉर्मेलिन का म्हणून घालणार असा सवाल त्यांनी केला. गोव्यातील पर्यटन व्यवसाय कारवार व मालवणातील माशांवर चालतो याची जाणीव गोवा सरकारने ठेवण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.