शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात तब्बल 3.32 लाखांचे अंमली पदार्थ जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 4:18 PM

मडगाव: गोव्यात पर्यटन मोसम सध्या तेजीत असताना केवळ कळंगूट-बागा या पट्ट्यांतच अंमली पदार्थ वाढलेले नसून दक्षिण गोव्यातही अंमली पदार्थाचे लोण पसरले आहे.

मडगाव: गोव्यात पर्यटन मोसम सध्या तेजीत असताना केवळ कळंगूट-बागा या पट्ट्यांतच अंमली पदार्थ वाढलेले नसून दक्षिण गोव्यातही अंमली पदार्थाचे लोण पसरले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या 13 दिवसांत ड्रग्ज विषयक दहा गुन्हेगारी प्रकरणे नोंद झाली असून त्यातील विशेष बाब म्हणजे त्यापैकी आठ प्रकरणे मडगाव, वास्को या दक्षिण गोव्यातील भागातील आहेत. या दहापैकी आठ प्रकरणे गांजाशी निगडित आहेत.सोमवारी दक्षिण गोव्यात वेर्णा व मडगाव येथे अशाच प्रकारची दोन प्रकरणे उघडकीस आली. रविवारी मध्यरात्री वेर्णा पोलिसांनी वेर्णा भागात गांजा विकत असताना मूळ झारखंड येथील नमितकुमार गोपे या 22 वर्षीय युवकाला अटक करून त्याच्याकडून 65 हजार रुपयांचा गांजा पकडला होता. तर सोमवारी रात्री मडगाव पोलिसांनी मडगावच्या मोतीडोंगर या झोपडपट्टीत राहणा-या बिनबंधू साहू या 32 वर्षीय मूळ ओडिशाच्या हमालाला अटक करून त्याच्याकडून 13 हजाराचा गांजा जप्त केला.आतापर्यंत पहिल्या 13 दिवसांत नोंद झालेल्या दहा प्रकरणात एकूण 12 जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून 3.32 लाख रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त केले आहेत. अटक केलेल्यांमध्ये चार गोमंतकीय, पाच बिगर गोमंतकीय यांच्यासह अन्य तीन नायजेरियनांचा समावेश आहे. गोव्यात येणारा हा गांजा केरळ व कर्नाटक या मार्गातून विशेषत: रेल्वेतून येत असल्याचा निष्कर्ष गोवा पोलिसांनी काढला आहे.नोव्हेंबर महिन्याच्या 3 तारखेला मडगाव व वास्को येथे अशा प्रकारच्या दोन घटना घडल्या होत्या. मडगाव पोलिसांनी गोपाळ गोगोई या आसामी सुरक्षारक्षकाला अटक करून त्याच्याकडून 39 हजारांचा गांजा जप्त केला होता. त्याच दिवशी वास्को पोलिसांनी दोन महाविद्यालयात शिकणा-या युवकांना 15 हजारांच्या गांजासह रंगेहात पकडले होते.4 नोव्हेंबरला कळंगूट पोलिसांनी आगुस्तीन डिसोझा या 34 वर्षीय युवकाला अटक करून त्याच्याकडून 10 हजारांचे हेरॉईन जप्त केले होते. तर 5 नोव्हेंबर रोजी वास्को येथे सुभाषचंद्र यादव या उत्तर प्रदेशच्या इसमाला अटक करून त्याच्याकडून 10 हजारांचा गांजा जप्त केला होता. यातील नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे मडगाव व वास्को ही दोन्ही शहरे रेल्वेला जोडली गेली आहेत. 7 नोव्हेंबर रोजीही गोव्यात अंमली पदार्थाच्या दोन प्रकरणांची नोंद झाली होती. मडगाव पोलिसांनी महादेव शेटकर या बसचालकाला अटक करून त्याच्याकडून 10 हजारांचा गांजा जप्त केला होता. त्याच दिवशी कळंगूट पोलिसांनी क्रिस ओव्हेरा या 25 वर्षीय नायजेरियनाला कांदोळी येथे अटक करून त्याच्याकडून 5 हजारांचा गांजा जप्त केला होता.11 नोव्हेंबर रोजी विनोद शर्मा या महाराष्ट्रातील इसमाला पणजी पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडून दीड लाखाचा गांजा जप्त केला. 12 नोव्हेंबरला मायकल ओकेरो व आदिलेक खलिद या दोन नायजेरियनाना कांदोळी येथे अटक करून त्यांच्याकडून 15 हजारांचा गांजा जप्त केला.

टॅग्स :goaगोवा