अखेर आमदारांना पेन्शन, भत्तेवाढ विधेयकास मंजुरी; तिजोरीवर १९ कोटींचा अतिरिक्त भार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 08:42 IST2023-09-07T08:42:19+5:302023-09-07T08:42:49+5:30
या वाढीमुळे तिजोरीवर वर्षाकाठी १९ कोटी ४६ लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.

अखेर आमदारांना पेन्शन, भत्तेवाढ विधेयकास मंजुरी; तिजोरीवर १९ कोटींचा अतिरिक्त भार
लोकमत न्यूज नेटवर्क पणजीः आमदारांना पेन्शन व भत्त्यांमध्ये भरमसाट वाढ देण्यासाठी विधानसभेत संमत केलेल्या कायदा दुरुस्ती विधेयकाला राज्यपाल पी. एस. श्रीधरन् पिल्लई यांनी मंजुरी दिली आहे. या वाढीमुळे तिजोरीवर वर्षाकाठी १९ कोटी ४६ लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
गोवा विधिमंडळ सदस्य वेतन, भत्ते व पेन्शन कायदा दुरुस्ती विधेयक १० ऑगस्ट रोजी विधानसभेत संमत करण्यात आले होते. हे विधेयक राज्यपालांनी मंजूर केल्यानंतर आता अधिसूचना काढण्यात आली आहे. पेन्शनमध्ये वार्षिक ४ हजार रुपये वाढ होणार आहे.
कार खरेदीसाठी कर्जमर्यादा १५ लाख रुपयांवरून ४० लाख, घर खरेदीसाठी कर्जमर्यादा ३० लाखांवरून ४५ लाख रुपये, पेट्रोल किंवा डिझेल दरमहा ३०० लीटरवरून ५०० लीटर केले आहे. आमदार स्वतःसाठी पाच कर्मचाऱ्यांऐवजी आता खासगी सचिव (हेड क्लार्क वेतनश्रेणीत), खासगी सहायक (यूडीसी वेतन श्रेणीत), दोन कनिष्ठ लिपिक, एक शिपाई व दोन चालक असे एकूण सात कर्मचारी सेवेत घेऊ शकतील.