फोन क्रमांक न दिल्याने युवतीचा पकडला हात, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 22:44 IST2018-01-30T22:44:21+5:302018-01-30T22:44:34+5:30

फोन नंबर न दिल्यामुळे यवतीचा हात पकडणा-या महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर पणजी महिला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Filing an FIR against the youth, holding a woman's hand, without giving a phone number | फोन क्रमांक न दिल्याने युवतीचा पकडला हात, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

फोन क्रमांक न दिल्याने युवतीचा पकडला हात, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

पणजी: फोन नंबर न दिल्यामुळे यवतीचा हात पकडणा-या महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर पणजी महिला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार समितीने तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला.
संशयिताचे नाव कॅल्विन फर्नांडिस असे असून, तो आणि पीडित युवती पणजीतील एका महाविद्यालयात शिकत आहेत.

युवतीपेक्षा संशयित वयाने लहान आहे आणि खालच्या वर्गातही आहे. मागील बरेच दिवस तो त्या मुलीचा पाठलाग करीत होता. तिच्याकडे त्याने फोन नंबर मागितला. परंतु युवतीने तो देण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने तिचा हात पकडला. या प्रकरणात युवतीने महाविद्यालयात शिक्षकांना जाऊन हा प्रकार सांगितला.

महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार समितीने या प्रकरणात चौकशी करून नंतर पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली. या प्रकरणात युवकावर भारतीय दंड संहिता कलम ३५४ डी अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Filing an FIR against the youth, holding a woman's hand, without giving a phone number

टॅग्स :goaगोवा