गोव्यातील विदेशी व्यक्तींच्या व्यवसायांची एफडीएकडून तपासणी, ड्रग्ज अड्डे उध्वस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 20:36 IST2018-12-04T20:36:04+5:302018-12-04T20:36:33+5:30

गोव्यातील किनारपट्टी भागांमध्ये ज्या विदेशी व्यक्ती विविध प्रकारचे क्लब्स, शॉक्स, हॉटेल्स चालविण्याचे धंदे करत आहेत, त्यांची यादी सरकारच्या अन्न व औषध प्रशासन खात्याने (एफडीए) तयार केली आहे.

FDA to investigate foreign business persons in Goa, seek help from police to destroy drugs | गोव्यातील विदेशी व्यक्तींच्या व्यवसायांची एफडीएकडून तपासणी, ड्रग्ज अड्डे उध्वस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेणार

गोव्यातील विदेशी व्यक्तींच्या व्यवसायांची एफडीएकडून तपासणी, ड्रग्ज अड्डे उध्वस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेणार

पणजी : गोव्यातील किनारपट्टी भागांमध्ये ज्या विदेशी व्यक्ती विविध प्रकारचे क्लब्स, शॉक्स, हॉटेल्स चालविण्याचे धंदे करत आहेत, त्यांची यादी सरकारच्या अन्न व औषध प्रशासन खात्याने (एफडीए) तयार केली आहे. लवकरच एफडीएकडून पोलिसांच्या मदतीने अशा ठिकाणी तपासणी करून कारवाई केली जाईल. विदेशींकडून चालविले जाणारे अनेक शॉक्स, क्लब, हॉटेल्स तपासली जातील, असे आरोग्य खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी मंगळवारी येथे जाहीर केले.

राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. एफडीएने पोलीस प्रमुखांना पत्र लिहिले आहे व एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन-तीन पोलीस शिपाई असलेले पथक पुरविण्याची विनंती केली आहे. पोलीस प्रमुख त्यासाठी तयार झाले आहेत. यापुढे एफडीएकडून विदेशी व्यक्तींचे धंदे तपासले जातील. एफडीएला गृहित धरता येणार नाही. अन्न सुरक्षेच्यादृष्टीने एफडीए कारवाई करील. क्लब, शॉक्स, हॉटेल यांची स्वयंपाकगृहे तपासली जातील. तीन तारांकित ते पाच तारांकित अशा सगळ्य़ा हॉटेल्समध्ये एफडीएची पथके कधीही भेट देऊ शकतात. एफडीएचा परवाना घेतलेला नाही असे आढळल्यास स्वयंपाकगृहे सील केले जाईल, असे मंत्री राणे यांनी सांगितले. विदेशींकडून गोव्यात केले जाणारे काही व्यवसाय म्हणजे अंमली पदार्थ विक्री व्यवसायाची केंद्रे आहेत, असेही राणे म्हणाले. आरोग्य खात्यात लवकरच काही दुरुस्त्या करून अन्न व औषध प्रशासन यंत्रणोला ज्यादा अधिकार दिले जाणार आहेत हेही त्यांनी नमूद केले.

छोट्या विक्रेत्यांना दिलासा
गोव्यात सध्या मासळीची आयात बंद आहे. गोव्यापासून 60 किलोमीटर अंतराच्या परिघात जे छोटे मासळी व्यवसायिक स्वत:चा व्यवसाय करतात त्यांना दिलासा देण्यासाठी सरकार काही पाऊले निश्चितच उचलणार आहे.त्यासाठी आवश्यक ते उपाय योजण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. छोट्या व्यवसायिकांना मदत करावी असे आम्ही ठरवले आहे. फक्त छोट्या व्यवसायिकांच्या नावाखाली मोठे मासळी व्यापारी घुसू नयेत म्हणून काळजी घेतली जात आहे. कारण एकदा मोठे व्यापारी जर घुसले तर पुन्हा फॉर्मेलिन माशांचा वाद निर्माण होऊ शकतो, असे राणो म्हणाले.

Web Title: FDA to investigate foreign business persons in Goa, seek help from police to destroy drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा