दुचाकी अन् टिप्परचा भीषण अपघात, २३ वर्षीय युवक ठार

By काशिराम म्हांबरे | Updated: December 2, 2023 12:38 IST2023-12-02T12:38:16+5:302023-12-02T12:38:54+5:30

म्हापसा पोलिसांनी हा अपघात आज सकाळी १०.१५ च्या दरम्यान घडल्याचे सांगितले.

Fatal accident involving two-wheeler and tipper, death of youth | दुचाकी अन् टिप्परचा भीषण अपघात, २३ वर्षीय युवक ठार

दुचाकी अन् टिप्परचा भीषण अपघात, २३ वर्षीय युवक ठार

गोवा - राज्यात सध्या सुरु असलेली भीषण अपघाताची भीषण मालीका सुरुच आहे. पहाटे हडफडे येथे झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू होण्याच्या प्रकाराला काही तासांचा अवघी उलटली असता गिरी येथील जंक्शनजवळी नामोशी येथील शाळेच्यासमोर  झालेल्या दुसऱ्या अपघातात दुचाकी चालक ठार झाला आहे. विदेश विनोद पोळे ( वय २३ हळदोणा- खोर्जुवे ) असे त्या मयत युवकाचे नाव आहे.

म्हापसा पोलिसांनी हा अपघात आज सकाळी १०.१५ च्या दरम्यान घडल्याचे सांगितले. विदेश पोळे हा आपल्या दुचाकीने पर्राहून हॉटेल ग्रीननपार्कच्या दिशेने जात होता.  त्याच्या समोरून जाणाºया ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न पोळे यांनी केला. या प्रयत्नात त्याचा तोल जाऊन तो दुचाकीसह  ट्रकच्या  खाली आला आणि चाकाखाली चिरडला गेला.

अपघाताची माहिती मिळताच म्हापसा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक दिनेश मुखिया आणि हवालदार शिवाजी शेटकर यांनी घटनास्थळी जाऊन अपघाताचा पंचनामा केला. विदेशचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरणीय तपासणीसाठी जीएमसीत पाठवून देण्यात आला आहे. या प्रकरणी ट्रक चालक  रघुनाथ पवार ( मूळ कोल्हापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतलेआहे.

Web Title: Fatal accident involving two-wheeler and tipper, death of youth