शेतकरी स्वावलंबी, तर देश समृद्ध : श्रीपाद नाईक; दोन दिवसांच्या जागरूकता, क्षमता विकास कार्यशाळेचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 07:39 IST2025-05-17T07:37:32+5:302025-05-17T07:39:39+5:30

'प्रधानमंत्री सूर्यघर : मुफ्त बिजली योजना' आणि 'प्रधानमंत्री कुसुम योजना' या दोन ऐतिहासिक योजनांबाबत जागरूकता आणि क्षमता विकास कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाला केंद्रीय मंत्री संबोधित करीत होते.

farmers are self reliant while the country is prosperous said shripad naik | शेतकरी स्वावलंबी, तर देश समृद्ध : श्रीपाद नाईक; दोन दिवसांच्या जागरूकता, क्षमता विकास कार्यशाळेचे उद्घाटन

शेतकरी स्वावलंबी, तर देश समृद्ध : श्रीपाद नाईक; दोन दिवसांच्या जागरूकता, क्षमता विकास कार्यशाळेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : स्वावलंबन याचा दुसरा अर्थ समृद्धी. शेतकरी स्वावलंबी झाला तर तो समाजाचा, देशाचा आधार ठरेल. जेणेकरून समाज आणि देश समृद्ध होईल, देशाच्या अर्थकारणाला आणि देशबांधणीत हातभार लागेल, असे उद्‌गार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी काढले.

'प्रधानमंत्री सूर्यघर : मुफ्त बिजली योजना' आणि 'प्रधानमंत्री कुसुम योजना' या दोन ऐतिहासिक योजनांबाबत जागरूकता आणि क्षमता विकास कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाला केंद्रीय मंत्री संबोधित करीत होते. भारत सरकारच्या नवीन आणि नवकरणीय मंत्रालयाच्या सहयोगाने गेडा (GEDA) तर्फे आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्याला व्यासपीठावर वीज खात्याचे प्रमुख अभियंते स्टीफन फर्नाडिस, कृषी खात्याचे संचालक संदीप फळदेसाई, नवीन आणि नवीकरणीय खात्याचे संचालक सोहम उसकईकर, गेडाचे चेअरमन गौरेश पिळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

दोन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत शेतकरी, बँकेचे अधिकारी, कृषी खात्याचे अधिकारी, गेडा व डिस्कॉम चे तसेच विक्रेता संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले असून त्यांना नवीन आणि नवनीकरणीय मंत्रालयाचे वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि विशेषज्ञ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

'कुसुम' योजना शेतकऱ्यांसाठी ठरणार लाभदायी : फळदेसाई

गोवा अजूनही वीज आणि फळभाज्यांच्या बाबतीत इतर राज्यांवर अवलंबून आहे. ग्लोबल वॉर्मिंग चा गोव्याच्या शेतीवर गंभीर परिणाम झालेला आहे. काजूचे पीक ५० टक्क्यांनी घसरले आहे. प्रधानमंत्री कुसुम योजना विशेष करून शेतकऱ्यांना लाभदायी ठरणार असून लोकांनी आपल्या पडिक जमिनींचा आणि सकस परंतु वापरात न येणाऱ्या जमिनींचा पुरेपूर उपयोग करावा, असे आवाहन कृषी खात्याचे संचालक संदीप फळदेसाई यांनी केले.

योजना कल्याणकारी : स्टिफन फर्नांडिस

हवामान बदलामुळे लोक त्रस्त झालेले असून जीवन जगणे कठीण झाले आहे. अशावेळी केंद्र सरकारच्या या दोन्ही योजना लोकांना दिलासा देणाऱ्या व कल्याणकारी ठरल्या आहेत. या योजना यशस्वी करण्यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे, असे सांगून वीज खात्याचे प्रमुख अभियंते स्टिफन फर्नांडिस यांनी गोव्यात या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे विशेष प्रयत्न करीत असल्याबद्दल त्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Web Title: farmers are self reliant while the country is prosperous said shripad naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.