फर्दिन रिबेलो यांचा कॅसिनोविरोधातील लढ्याला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:07 IST2026-02-18T13:07:11+5:302026-02-18T13:07:43+5:30

नवीन कॅसिनो जहाजाला परवानगी देण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.

fardin rebelo supports the fight against casino in panjim goa | फर्दिन रिबेलो यांचा कॅसिनोविरोधातील लढ्याला पाठिंबा

फर्दिन रिबेलो यांचा कॅसिनोविरोधातील लढ्याला पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सोशल मीडियावर मांडवी नदी पात्रातील कॅसिनोविरोधात 'पणजेंकार अगेन्स्ट कॅसिनो'च्या बॅनरखाली सुरू असलेल्या आंदोलनाला निवृत्त मुख्य न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. 

कॅसिनोसंदर्भातील मुद्द्यांवर ते राज्य सरकारला पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले. न्या. रिबेलो यांच्या पाठिंब्यामुळे आंदोलनाला नवे बळ मिळाले असून, नागरिकांच्या भूमिकेला कायदेशीर आधार मिळण्याची शक्यता आहे. आंदोलकांना पाठिंबा देणाऱ्या पत्रात त्यांनी नमूद केले की, पणजी व परिसरातील नागरिकांचा विरोध हा नैतिक तसेच पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने योग्य आहे.

कॅसिनोविरोधात 'पणजेंकार अगेन्स्ट कॅसिनो'च्या बॅनरखाली सुरू असलेल्या आंदोलनाला निवृत्त मुख्य न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. कॅसिनोसंदर्भातील कायदेशीर मुद्द्यांवर राज्य सरकारला आपण पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

'जुगार हा कोणाचाही मूलभूत हक्क नसून तो पूर्णपणे सरकारच्या परवानगीवर अवलंबून असतो. पणजीचे रूपांतर कॅसिनो राजधानीमध्ये झाले असून, मांडवी किनाऱ्यालगत राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनमानावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे,' असे त्यांनी नमूद केले.

नागरिकांचा विरोध

दरम्यान, नवीन कॅसिनो जहाजाला परवानगी देण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. सुमारे ११२ मीटर लांब व २७ मीटर उंच असलेल्या या जहाजावर दोन हजार लोकांना सामावून घेण्याची क्षमता असणार आहे. या जहाजाला विरोध अधिक तीव्र होत आहे.

 

Web Title : न्यायमूर्ति रिबेलो ने पणजी, गोवा में कैसीनो के खिलाफ लड़ाई का समर्थन किया

Web Summary : सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश रिबेलो ने मांडवी नदी पर कैसीनो के विरोध में 'पणजेंकर्स अगेंस्ट कैसीनो' आंदोलन का समर्थन किया। वे नैतिक और पर्यावरणीय चिंताओं का हवाला देते हुए राज्य सरकार को लिखेंगे। स्थानीय लोगों पर इसके प्रभाव के कारण नागरिक प्रस्तावित नए कैसीनो जहाज का विरोध कर रहे हैं।

Web Title : Justice Rebeiro Backs Fight Against Casinos in Panaji, Goa

Web Summary : Retired Chief Justice Rebeiro supports the 'Panajenkars Against Casino' movement, opposing casinos on the Mandovi River. He will write to the state government, citing moral and environmental concerns. Citizens protest a proposed new casino ship due to its impact on locals.