शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

शापोरा किल्ल्याच्या पायथ्याशी उभारलेले बेकायदेशीर गाळे जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 11:26 PM

हणजूण येथील शापोरा किल्ल्याच्या पायथ्याशी बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेले तात्पुरते व्यावसायीक गाळे पुरातत्व खात्याने पोलीस बंदोबंस्तात जमीनदोस्त केले.

म्हापसा : हणजूण येथील शापोरा किल्ल्याच्या पायथ्याशी बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेले तात्पुरते व्यावसायीक गाळे पुरातत्व खात्याने पोलीस बंदोबंस्तात जमीनदोस्त केले.शापोरा किल्ल्याचे सौंदर्यीकरण करण्याकरीता व या किल्ल्यावर जाण्याकरीता पायथ्याशी डोंगर फोडून रस्त्याचे काम करण्यात येत आहे. हा रस्ता एका राजकारण्याला फायदेशीर ठरणारा आहे असे सांगून स्थानिकांनी हे काम बंद पाडले होते. हल्लीच पुरातत्व खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी या किल्ल्याची पाहणी करून बंद पडलेले काम पुन्हा सुरू करण्यास सा. बां. खात्यास सांगितले होते. दरम्यान, या ठिकाणी अनेक स्थानिकांनी पर्यटकांच्या सोयीकरीता व आपल्या उदरनिर्वाहाची सोय म्हणून लहान व्यवसाय सुरू केले. या करीता त्यांनी तात्पुरते गाळे उभारले होते. आज ते धडक कारवाईत जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी म्हापशाचे उपजिल्हाधिकारी गौरिश शंखवाळकर, मामलेदार दशरथ गावस, इतर संयुक्त मामलेदार पुरातत्व खात्याच्या अधिकारी बी. मदेरा उपस्थित होत्या. या तात्पुरत्या व्यावसायीक बेकायदेशीर गाळ्याबाबत स्थानिकांकडूनच तक्रार आली होती. यापूर्वी मोजणी केली तेव्हा ते १९ होते. आता त्यात वाढ झाली असावी असे पुरातत्व खात्याचा अधिकारी बी. मदेरा यांनी सांगितले. तर सर्व गाळे बेकायदा होते व यात बेकायदेशीर मद्यविक्री होत होती अशा तक्रारी होत्या तसेच आपण कायदा सुरक्षा सुरळीत राखण्यासाठी येथे हजर असल्याचे उपजिल्हाधिकारी गौरिश शंखवाळकर यांनी सांगितले. सरकारने गरीबाचे गाळे मोडून त्यांच्या पोटावर पाय दिला आहे. बेकायदेशीररित्या बांधण्यात येणारे मोठे हॉटेल बांधकाम प्रकल्पावर कोणतीही कारवाई होत नाही. नोकरी नाही म्हणून लहान व्यवसाय करणाºयांवर कारवाई होते. सरकारने त्यांना नोकºया तरी द्याव्या किंवा व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अन्यथा त्या सर्वांना सोबत घेऊन आंदोलन छेडावे लागेल असे शापोरा बोट मालक संघटनेचे माजी अध्यक्ष बलभीम मालवणकर यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवा