वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 15:05 IST2025-08-19T15:04:38+5:302025-08-19T15:05:14+5:30
भूमिगत वीजवाहिनी लीक झाल्याने रस्त्यावर करंट येत होता. एका व्यक्तीला विजेचा धक्का लागल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
गोव्यातून एक खळबळजनक बातमी येत आहे. वरून पाऊस ओतत असताना भूमिगत वीजवाहिनी लीक झाल्याने रस्त्यावर करंट येत होता. एका व्यक्तीला विजेचा धक्का लागल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गोव्यातील म्हापसा मार्केटमध्ये हा प्रकार घडला आहे. सोमवारी रात्री ८ च्या सुमारास शकुंतला पुतळ्याजवळच्या रस्त्यावर विद्युत प्रवाह प्रवाहित झाला होता. यामुळे तेथून जात असलेल्या एका व्यक्तीला विजेचा धक्का बसला. सुरुवातीला कोणाला काहीच कळत नव्हते, अखेर वीज पुरवठा विभागाला याची माहिती देण्यात आली. दुकानदारांनी ही माहिती कळविली. यानंतर वीज पुरवठा विभागाने बाजारातील वीज पुरवठा खंडित केला.
या रस्त्यावर वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी टेस्टरने विद्युप प्रवाह वाहतोय का याची पाहणी केली. यामध्ये टेस्टरमधील लाईट पेटू लागली होती. यामुळे या परिसरातील व्यापारी, ये-जा करणाऱ्या ग्राहकांसह रहिवाशांची भीतीने गाळण उडाली होती. या रस्त्याखाली टाकलेली भूमिगत वीज केबल खराब झाल्याचे समोर आले. मिगत वीज तारांसाठी निकृष्ट दर्जाची उपकरणे वापरल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.