२०२७ गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे शिवसेनेची मोर्चेबांधणी; पूर्ण ताकदीने स्वबळावर लढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 12:59 IST2026-03-25T12:57:41+5:302026-03-25T12:59:06+5:30

गोव्यातील आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीनिशी आणि स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

eknath shinde shiv sena frontline for the goa assembly elections 2027 indication contest on its own with full strength | २०२७ गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे शिवसेनेची मोर्चेबांधणी; पूर्ण ताकदीने स्वबळावर लढणार!

२०२७ गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे शिवसेनेची मोर्चेबांधणी; पूर्ण ताकदीने स्वबळावर लढणार!

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: आगामी २०२७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे शिवसेना पक्षाने आतापासूनच कंबर कसली आहे. मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, गोव्यात शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार घेतला असून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला गती देण्यात येत असल्याची माहिती राज्यप्रमुख उपेंद्र गावकर आणि राज्य सचिव काशिनाथ मयेकर यांनी दिली.

पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गोव्यातील आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीनिशी आणि स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यप्रमुख आणि सचिवांनी आतापासूनच संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून, जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे, असेही या पत्रकार परिषदेत गावकर यांनी सांगितले.

राज्य संपर्क नेते गजानन कीर्तीकर, मुख्य सल्लागार डॉ. श्रीकांत शिंदे आणि संपर्कप्रमुख सुभाष सावंत यांच्या थेट मार्गदर्शनाखाली राज्यातील विविध तालुका आणि मतदारसंघांसाठी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

दक्षिण व उत्तर जिल्हा सुनील सांतिनेजकर व प्रमुख गणबा देसाई व संघटनांच्या यांच्या मदतीने संपूर्ण गोव्यात पक्षविस्तार करण्यात येत आहे.

नवनियुक्त प्रमुख पदाधिकारी: उत्तर जिल्हा उपप्रमुख-अॅड. अर्जुन गवंडी, दक्षिण जिल्हा उपप्रमुख सुहास खांडेकर. तालुका आणि विभाग स्तरावरी. तालुकाप्रमुख -अनिल नाईक (डिचोली), प्रशांत शेट (बार्देश), दिवाकर आरोलकर (पेडणे), गजानन मुदगेकर (तिसवाडी), प्रताप नाईक (फोंडा), दिनेश नाईक (सांगे), विश्वानंद नाईक (धारबांदोडा), ओंकार आदील (केपे). विभाग प्रमुख : योगेश आखाडकर (पेडणे), किशोर फडते (पर्वरी), अनंत कारेकर (साखळी), शाखा प्रमुख - रामदास गोवेकर (पर्वरी). महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना गोव्यात आगामी २०२७ ची विधानसभा निवडणूक 'स्वबळावर लढणार असल्याचे सांगण्यात आले.

 

Web Title : शिंदे की शिवसेना 2027 गोवा चुनाव के लिए तैयार, अकेले लड़ेगी!

Web Summary : शिंदे की शिवसेना 2027 गोवा विधानसभा चुनाव के लिए कमर कस रही है। एकनाथ शिंदे के आदेशानुसार, पार्टी अकेले चुनाव लड़ेगी। संगठन को मजबूत करने के प्रयास जारी हैं, गोवा के तालुकों और निर्वाचन क्षेत्रों में नई नियुक्तियाँ की गई हैं। जनसंपर्क बढ़ाने और संभावित उम्मीदवारों की पहचान पर ध्यान केंद्रित किया जा रहा है।

Web Title : Shinde's Shiv Sena Prepares for 2027 Goa Elections, to Contest Independently!

Web Summary : Shinde's Shiv Sena is gearing up for the 2027 Goa Assembly elections. The party will contest independently, as per Eknath Shinde's orders. Organizational efforts are underway, with new appointments made across Goa's talukas and constituencies. Focus is on strengthening public relations and identifying potential candidates.