शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

ईडीएम आयोजक 'सनबर्न क्लासिक'ला हायकोर्टाचा दणका; बांधकाम हटविण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 13:38 IST

गोव्यातील वागातोर येथे २७ पासून होऊ घातलेला इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हल अडचणीत

पणजी : वागातोर येथे येत्या २७ ते २९ या दरम्यान होऊ घातलेल्या सनबर्न क्लासिकच्या इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिवल पार्टीला मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने दणका दिला आहे. वागातोर येथे पार्टीसाठी उभारलेले हंगामी बांधकाम काढून टाकण्याचा आदेश कोर्टाने दिला असून पंचायत तसेच अन्य संबंधित यंत्रणांकडून ना हरकत दाखला घेतल्यानंतरच बांधकाम केले जावे असे निर्देश दिले आहेत. हायकोर्टाने  बांधकामाला स्थगिती दिली होती, मात्र ती डावलून कंपनीने हंगामी बांधकाम चालविले होते. २ कोटी २५ लाख रुपये आगाऊ शुल्क भरण्याचे आदेशही कंपनीला देण्यात आले आहेत.

ईडीएमचे आयोजक सनबर्न क्लासिकची कडक शब्दात कानउघाडणी करताना स्थगिती डावलून बांधकाम केलेच कसे?, असा संतप्त सवाल हायकोर्टाने केला आहे. उभारण्यात आलेले सर्व बांधकाम आधी हटवा. त्यानंतर ना हरकत दाखल्यासाठी अर्ज करा आणि आयोजकांनी सर्व जमीन पूर्ववत करून दिल्याची खातरजमा केल्यानंतरच  स्थानिक पंचायतीने परवाना द्यावा, असे कोर्टाने बजावले आहे.

गोव्यात नववर्षाच्या स्वागतासाठी सनबर्न क्लासिकचा ईडीएम वागातोर किनाऱ्यावर आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी ऑनलाइन तिकीट विक्रीही धुमधडाक्यात चालू आहे. नाताळ- नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात देणारे हजारो देशी-विदेशी पर्यटक या ईडीएममध्ये भाग घेतात. हजारोंच्या संख्येने विदेशी पर्यटक खास ईडीएमसाठी येत असतात. प्रसंगी 60 ते 70 हजारांपेक्षा मोठा जमाव असतो आणि या भागात यामुळे वाहतूक कोंडीचे प्रकारही घडतात. सनबर्न

क्लासिकने या ठिकाणी हंगामी बांधकाम सुरू केले होते. कोर्टाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. उभारलेले सर्व बांधकाम काढून टाकावे आणि जमीन पूर्ववत करून पंचायत तसेच अन्य संबंधित यंत्रणांकडून आवश्यक हरकत दाखले आधी घ्यावेत, असे आदेश दिले आहेत. इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिवल सात दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी होतील की नाही आणि ईडीएम यंदा होईल की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. 

दरम्यान, हिंदू जनजागृती समिती तसेच अन्य संघटनांनी ईडीएमला विरोध केला आहे. ईडीएममध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा वापर होतो असा आरोप आहे. या आधीही अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे दोन बळी गेलेले आहेत. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी तसेच ईडीएममध्ये पाश्चात्य संगीताचा धागडधिंगाणा चालतो, ही संस्कृती भारताची नव्हे, असा दावा करीत विरोध चालू आहे. दुसरीकडे  कंपनीकडून एक कोटी रुपये थकबाकी सरकारला येणे असल्याचे खुद्द पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी स्पष्ट केले आहे. हे एक कोटी रुपये वसूल केल्या शिवाय कंपनीला अंतिम परवाना दिला जाणार नाही, असेही त्यांनी घोषित केले आहे. या एकूणच पार्श्वभूमीवर गोव्यातील हा ईडीएम अडचणीत आला आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयgoaगोवाSunburn Festivalसनबर्न फेस्टिव्हल