ईव्हीमळे 'कदंब'चा महसूल दुप्पट; २०२४-२५ मध्ये केली १०७ कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 08:40 IST2025-07-24T08:40:46+5:302025-07-24T08:40:59+5:30

आमदार दिगंबर कामत यांनी हा लेखी प्रश्न अधिवेशनात मांडला होता.

due to ev buses kadamba revenue get double earns 107 crore in 2024 and 25 | ईव्हीमळे 'कदंब'चा महसूल दुप्पट; २०२४-२५ मध्ये केली १०७ कोटींची कमाई

ईव्हीमळे 'कदंब'चा महसूल दुप्पट; २०२४-२५ मध्ये केली १०७ कोटींची कमाई

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कदंब महामंडळाच्या महसुलात वाढ झाली असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात १०७ कोटी २९ रुपये महसूल कदंब महामंडळाला मिळाला आहे. २०२१-२२ मध्ये हा महसूल ५५ कोटी ३१ लाख एवढा होता, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी लेखी स्वरूपात दिली आहे. आमदार दिगंबर कामत यांनी हा लेखी प्रश्न अधिवेशनात मांडला होता.

तसेच मागील वर्षात ईव्ही कदंब बसेस मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आल्या; त्यामुळे डिझेलचा खर्च घटला. त्यामुळे या महामंडळाच्या महसुलात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

ईव्ही ठरल्या फायदेशीर

कोरोना काळात कदंबच्या बसेस बंद होत्या. यावेळी मोठ्या प्रमाणात आंतरराज्य बस तसेच इतर बससेवा बंद असल्याने महसुलात मोठी घट झाली होती. नंतर महसुलात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी महसूल दुप्पट झाला. यामध्ये बसवाहतूक महसूल, पार्सल सर्व्हिस, लगेज, बसस्थानकावरील शॉप लाइन्स तसेच स्क्रॅपला गाड्यांचा समावेश आहे.

वर्ष : महसूल

२०२१ - २२ - ५५ कोटी ३१ लाख
२०२२ - २३ - ८६ कोटी ८९ लाख
२०२३ - २४ - १०४ कोटी ८३ लाख
२०२४ - २०२५ - १०७ कोटी २९ लाख

 

Web Title: due to ev buses kadamba revenue get double earns 107 crore in 2024 and 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.