शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

मद्यपी पर्यटकाने कारखाली चिरडून रिसॉर्ट मालकिणीचा घेतला बळी

By किशोर कुबल | Updated: November 13, 2023 13:34 IST

वागातोर येथील जॉली जॉली लेस्टर रिसॉर्टमध्ये हा अपघात घडला.

किशोर कुबल, पणजी: गोव्याला भेट देणारे येथे मद्यपान केल्यानंतर नियंत्रणाबाहेर जातात. अनेकदा अपघात घडतात आणि निष्पाप नागरिकांचा बळी जातो. अशाच एका प्रकरणात पुणे येथील एका पर्यटकाने वागातोर येथे मद्यधुंद अवस्थेत कार रिसॉर्टमध्ये घुसवल्याने तेथे उभी असलेली रिसॉर्टची मालकीण ठार झाली.

कोंडवा, पुणे येथिल सचीन वेणुगोपाल कुरुप (वय ४२) याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. वागातोर येथील जॉली जॉली लेस्टर रिसॉर्टमध्ये हा अपघात घडला. रिसॉर्टच्या काउंटरजवळ मालकीण श्रीमती रेमेडिया मॅरी आल्बुकर्क (वय ५७) ही उभी असता सचीन याने भरवेगात एचआर-१३- जी-१८३१ क्रमांकाची एसयुव्ही कार तिच्या अंगावर चढवली. या अपघातात ती जागीच ठार झाली तर रिसॉर्टचे अन्य दोन कर्मचारी शिवमंगल दिंडां( २५) व रुपा पारस (३१) किरकोळ जखमी झाले.

अपघाताच्यावेळी सचिन हा मद्यधुंद अवस्थेत होता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी त्याला भादंसंच्या कलम ३०४ खाली सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा नोंदवून अटक केली आहे. प्राप्त महितीनुसार सचीन हा आसगांव येथे कासा ब्लांका व्हिल्लामध्ये रहात होता व वागातोर येथे वरील रिसॉर्टमध्ये आपल्या मित्राला भेटायला आला होता. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी