शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

ड्रग्स उत्पादक... गोव्याची गुन्हेगारी क्षेत्रातील नवीन ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 14:15 IST

गोवा हे अंमलीपदार्थ विक्रीचे मुख्य केंद्र मानले जायचे. मात्र यावर्षी ड्रग्स निर्मिती करणारी चार प्रकरणे उजेडात आल्याने गोवा हे ‘ड्रग्स उत्पादन’चेही केंद्र बनल्याचे स्पष्ट झाले.

ठळक मुद्दे ड्रग्स निर्मिती करणारी चार प्रकरणे उजेडात आल्याने गोवा हे ‘ड्रग्स उत्पादन’चेही केंद्र बनल्याचे स्पष्ट झाले.1 जानेवारी ते 15 डिसेंबरपर्यंत गोव्यात एकूण 213 अंमली पदार्थाचे गुन्हे नोंद झाले असून त्यात 224 व्यक्तींना पकडण्यात आले. यंदा गोवा पोलिसांनी तब्बल 3.77 कोटींचा अंमलीपदार्थ पकडला.

सुशांत कुंकळयेकर

मडगाव - खून, बलात्कार, घरफोड्या यासारख्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यास गोवापोलिसांना चालू 2018 सालात यश आले असले तरी या वर्षाने गुन्हेगारी क्षेत्रात गोव्याची नवीनच ओळख तयार करुन दिली. आतापर्यत गोवा हे अंमलीपदार्थ विक्रीचे मुख्य केंद्र मानले जायचे. मात्र यावर्षी ड्रग्स निर्मिती करणारी चार प्रकरणे उजेडात आल्याने गोवा हे ‘ड्रग्स उत्पादन’चेही केंद्र बनल्याचे स्पष्ट झाले.

यंदा अंमली पदार्थाच्या गुन्ह्यांनी गोव्यात अगदी धुमाकूळ घातला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 1 जानेवारी ते 15 डिसेंबरपर्यंत गोव्यात एकूण 213 अंमली पदार्थाचे गुन्हे नोंद झाले असून त्यात 224 व्यक्तींना पकडण्यात आले. यंदा गोवा पोलिसांनी तब्बल 3.77 कोटींचा अंमलीपदार्थ पकडला.

या वर्षाच्या दुसऱ्या महिन्यातच गोव्याचे ड्रग डेस्टीनेशन मानले जाणाऱ्या हरमल येथे अंमली पदार्थाच्या व्यवहारातून झालेल्या वादातून प्रिन्स आबोजो या 21 वर्षीय नायजेरियन युवकाचा खून झाला. या घटनेतून पोलीस यंत्रणा सावरत असतानाच 11 जून रोजी डीआरआयने पिसुर्ले येथील औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यावर धाड घातली असता हा कारखाना म्हणजे चक्क केटामाईन तयार करण्याचा अड्डा असल्याचे दिसून आले. या कारखान्यात बिनबोभाटपणे ड्रग्सचे उत्पादन चालू होते. या प्रकरणात दहा जणांना अटक करण्यात आली होती त्यात तीन विदेशी नागरिकांचा समावेश होता.

गोव्यातील आणखी एक ड्रग डेस्टीनेशन असलेल्या शिवोली येथे दोन वेगवेगळ्या घटनात रशियन्सकडून येथे गांजाची लागवड करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. त्यात एका प्रकरणात मागच्या परसबागेत तर दुसऱ्या प्रकरणात फ्लॅटमध्येच गांजाची लागवड केली जात असल्याचे स्पष्ट झाले. या दोन्ही प्रकरणात प्रत्येक दोन रशियन नागरिकांना अटक करण्यात आली होती. अंजुणा येथे कॉलर क्रिस्टीयान या ऑस्ट्रीयन नागरिकानेही आपल्या घरात सिंथेटीक ड्रग तयार करण्याची प्रयोगशाळा सुरु केल्याचे पोलीस निरीक्षक सी.एल. पाटील यांनी उघडकीस आणले. या छाप्यात तब्बल 1.30 कोटींचा माल सापडला होता.

या वर्षातील गुन्हेगारी क्षेत्रातील धक्कादायक अशा घटना म्हणजे 2 एप्रिल रोजी कुडचडे येथे बसूराज बारकी या टॅक्सी ड्रायव्हरचा त्याच्याच पत्नीने आपल्या साथीदारांच्या साहाय्याने केलेली निर्घृण हत्या असून या प्रकरणात मृतदेहाचे पाच तुकडे करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली होती. दुसरी धक्कादायक घटना म्हणजे 24 मे रोजी बेताळभाटी येथील सनसेट बीचवर एका 20 वर्षीय युवतीवर झालेली सामूहिक बलात्काराची घटना. या प्रकरणातील आरोपी ईश्वर मकवाना याच्यासह तिघांना अटक करण्यात आली असली तरी त्यातील ईश्वर मकवाना याने 10 डिसेंबर रोजी पलायन केल्याने गोवा पोलिसांची पुन्हा एकदा नाचक्की झाली.

राजकारणीही अडचणीत

2018 सालात कित्येक राजकारणीही अडचणीत आले. त्यात विद्यमान मंत्री मॉवीन गुदिन्हो, आमदार दिगंबर कामत तसेच माजी मंत्री मिकी पाशेको व दिलीप परुळेकर यांचा समावेश होता. या सर्व राजकारण्यांमागे त्यांची पूर्वीची प्रकरणे यावेळी फणा काढून उभी झाली. मिकी पाशेको याच्याविरोधात 2009 सालच्या माजोर्डा कॅसिनो धमकी प्रकरणात नव्याने आरोप निश्चित करण्यात आले तर दिगंबर कामत यांच्या विरोधात कुळे व काडणेकर खाण घोटाळा प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले. मॉवीन गुदिन्हो यांच्या विरोधात 2004 सालचे वीज घोटाळा प्रकरण वर आले तर दिलीप परुळेकर यांच्या विरोधात सेरुला कोमुनिदाद प्रकरणात सुनावणी सुरू झाली.

2018 च्या तावडीतून पोलिसही सुटू शकले नाहीत. गोवा पोलिसांचे माजी पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांच्या विरोधात लाच मागितल्याचा आरोप झाल्यानंतर सगळी पोलीस यंत्रणाच हादरली. हे प्रकरण लोकायुक्तापर्यत पोहोचले. वेर्णा येथील आर्सेला पार्सेकर या महिला कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याने उपनिरीक्षक गौतम शेटकर याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला. लाचखोरीच्या आरोपावरुन तीन तर नागरिकांना मारहाण करण्याच्या आरोपावरुन पाच पोलीस निलंबित झाले. यापूर्वी लाचखोरी प्रकरणात दोषी ठरलेला फोंडय़ाचा पोलीस उपनिरीक्षक राहुल धामसेकर याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले.  दोन लाचखोरीच्या आरटीओ अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले. वेगवेगळ्या कारणांखाली निलंबित होणाऱ्या सरकारी नोकरांची संख्या यंदा 60 वर पोहोचली.

कोलवाळ तुरुंगात भांग

कैद्यांना सुधारण्यासाठी स्थापलेल्या कोलवाळ तुरुंगातील यंत्रणाच खिळखिळी असल्याचे या चालू 2018 वर्षाने दाखवून दिले. होळीच्या दिवशी या तुरुंगात कैद्यांनी भांग पिऊन धिंगाणा घातल्यामुळे एका सहाय्यक जेलरसह चौघांवर निलंबित होण्याची पाळी आली. याच जेलमध्ये केलेल्या एका सर्चमध्ये एका ब्रिटीश आरोपीकडे गांजा सापडल्याने या तुरुंगाच्याही भिंती खिळखिळ्या असल्याचे स्पष्ट झाले.

बेताळभाटी घटनेने गोवा हादरला

बेताळभाटी येथे एका युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण गोवा हादरुन गेला.  त्याहीपेक्षा गोवेकरांना बसलेला सर्वात मोठा धक्का म्हणजे या प्रकरणात अटक केलेल्या ईश्वर मकवाना या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला तो होता. यंदा गोव्यात बलात्काराच्या 37 घटनांची तर विनयभंगाच्या 42 प्रकरणांची नोंद झाली. गोव्यात यंदा 26 खूनांची प्रकरणे घडली. त्यापैकी 25 प्रकरणांचा तपास पोलीस लावू शकले.

सुवर्णतस्करी

दाबोळी विमानतळावर यंदा आठ सुवर्ण तस्करींच्या घटना घडल्या. वेगवेगळ्या प्रकारे चोरीच्या मार्गाने गोव्यात सोने आणण्याच्या प्रयत्नात एकूण पाचजणांना अटक करण्यात आली. कस्टमने यंदा जप्त केलेल्या सोन्याची किंमत 3.46 कोटी एवढी होती. याशिवाय याच दाबोळी विमानतळावरुन दोन कोटींच्या विदेशी सिगरेटची तस्करी केलेल्या प्रकरणात डीआरआयने पाचजणांना अटक केली होती. तर सात लाखांचा चरस घेऊन आलेल्या एका विदेशी पर्यटकालाही या विमानतळावर अटक करण्यात आली.

सुरुवात व शेवट पर्यटनविषयक गुन्ह्यांनी 2018 ची सुरुवात

गोव्यात आलेल्या पर्यटकांकडून कळंगूट येथील एका हॉटेल कर्मचा:याच्या खुनाच्या घटनेने झाली तर यावर्षीच्या शेवटाला केवळ दहा दिवस बाकी असताना एका ब्रिटीश महिलेवर केलेल्या बलात्काराने गोवा हादरला. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात आलेल्या तेलंगणातील सोळा पर्यटकांनी कळंगूटच्या हॉटेलातील जयेश भंडारी या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने त्याला मृत्यू आला तर 20 डिसेंबर रोजी पाळोळे येथे 48 वर्षीय ब्रिटीश महिलेवर बलात्कार झाला. 2018 वर्षात गोव्यात दहा विदेशी पर्यटकांना मृत्यू येण्याच्या घटना घडल्या.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसDrugsअमली पदार्थ