शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

गोमंतकीय नाट्यलेखकाचा सीमापार झेंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 18:07 IST

‘थोडंसं लॉजिक, थोडंसं मॅजिक’ नाटक आता गुजरातेत चित्रपट रूपात 

पणजी : नाटक हा कलाप्रकार तसा गोमंतकीयांच्या नसानसांत भिनलेला. कोणी स्वत: नाट्यकलाकार, कोणी नाट्यलेखक, दिग्दर्शक, तर कोणी नाट्यवेडा रसिक. असेच एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व अर्थात, प्रख्यात गोमंतकीय नाट्यलेखक, दिग्दर्शक राजीव शिंदे यांनी सिने/नाट्य कला क्षेत्रात आणखी एक मानाचा शिरपेच खोवत सीमापार झेंडा फडकावला आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘थोडंसं लॉजिक, थोडंसं मॅजिक’ नाटकाचा आता चित्रपट साकारतोय, तोही गुजराती भाषेत. सर्वच गोमंतकीयांसाठी ही अभिमानास्पद बाब असून लवकरच हा चित्रपट रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. 

मराठी रंगभूमीवर लोटपोट हास्यकल्लोळ करून ‘थोडंसं लॉजिक, थोडंसं मॅजिक’ नाटकाने कला क्षेत्रात एक नवी उंची गाठली आहे. मराठी नाटकात मोहन जोशी, माधवी गोगटे यासारख्या दिग्गज कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात ‘चार चांद’ चमकावले आहेत. विशेष म्हणजे राजीव शिंदे लिखित ‘थोडू लॉजिक, थोडू मॅजिक’ या गुजराती भाषेतील नाटकानेही गुजराती मुलखात तब्बल २०० हून अधिक प्रयोग करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. या नाटकात टिकू तलसानिया आणि स्मिता जयकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कला क्षेत्रात या नाटकाला मिळालेली अफाट प्रसिद्धी लक्षात घेऊन याच नाटकाच्या संकल्पनेवर आधारित गुजराती सिनेमा साकारला जात आहे. हा चित्रपटही लोकप्रियतेच्या शिखरावर अढळ स्थान मिळवेल, अशी केवळ आशाच नव्हे, तर पूर्ण विश्वासही राजीव शिंदे यांनी व्यक्त केला आहे. आजोबा आणि नातू यांच्यातील नातेसंबंधांवर आधारित या सिनेमाचे कास्टिंग सध्या सुरू असून कथा, पटकथा दोन्ही शिंदे यांनी लिहिल्या आहेत. या सिनेमासाठी शिंदे यांनी गुजराती भाषाही आत्मसात केली असून गुजराती भाषांतरासाठी त्यांना स्नेहा देसाई या लेखिका साहाय्य करत आहेत. या चित्रपटाच्या विषयाला साजेशी स्टार कास्टिंग सुरू असून प्रमुख कलाकार कोण आहेत, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण लवकरच याविषयीची उत्कंठा संपुष्टात येणार आहे. मराठी रसिक प्रेक्षकांनी हे अक्षरश: नाटक डोक्यावर घेतले. गुजरातेतही या नाटकाने अफाट प्रसिद्धी मिळवली. आता हा सिनेमाही निश्चितच लौकिकास पावेल, असा विश्वास शिंदे यांनी यानिमित्ताने व्यक्त केला. 

- राजीव शिंदे यांच्याविषयी थोडंसं... राजीव शिंदे हे प्रसिद्धीपरागमुख व्यक्तिमत्त्व. शिंदे यांनी साधारण ३० वर्षांपूर्वी महाविद्यालयीन काळात विविध एकांकिका सादर केल्या. त्याकाळी नाट्यकलाकार मिळणे दुरापास्त होते. शिंदे यांनीही नाटकात रस दाखविला. त्यावेळी प्रख्यात नेपथ्यकार रघुवीर तळाशीलकर यांचे कला प्रदर्शन गोव्यात ठिकठिकाणी भरत असे. तेथे शिंदे यांची तळाशीलकर यांच्याशी ओळख झाली. मग नाट्य कला आत्मसात करण्यासाठी ते नाट्यनगरी मुंबईला गेले. तळाशीलकर यांच्याकडे नेपथ्यकला शिकून दोन वर्षे त्यांनी काही चित्रपटांचे सेटही उभारले. ‘लूटमार’, ‘मनपसंत’ या चित्रपटांतील गाण्यांसाठी त्यांनी सेट उभारले. नंतर त्यांना गोव्यात कला महाविद्यालयात नोकरीसाठी आॅफर आली. पुन्हा त्यांनी नोकरीच्या निमित्ताने गोव्याला प्राधान्य दिले. पण त्यांच्यातील नाट्यकलाकार त्यांना गप्प बसू देत नव्हता. त्यांनी अनेक नाटक, चित्रपटांचे लेखन, दिग्दर्शन केले. ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचे लेखन, नेपथ्य, दिग्दर्शन आणि प्रकाशयोजनाही त्यांनीच केली. 

कला क्षेत्रातील अनेक पुरस्कार शिंदे यांच्या नावावर आहेत. त्यातील काही प्रमुख पुरस्कार.

- १९९७ साली ‘देखणी दुराई’ या कोंकणी चित्रपटाला गोवा राज्य सरकारचा उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला. 

- २०१६ सालच्या ४७ व्या इफ्फीमध्ये त्यांनी कथा, पटकथा संवाद लिहून दिग्दर्शन केलेल्या ‘के सेरा सेरा’ चित्रपटाचा इंडियन पॅनोरमा विभागात समावेश होता. या चित्रपटासाठी त्यांना माजी राष्टÑपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला.

- ‘यु अ‍ॅण्ड मी’, ‘स्मोकिंग इज सुसाईड’, ‘पीस आॅफ मार्इंड गॅरेंटेड’ या त्यांच्या शॉर्ट फिल्मना विविध पुरस्कार प्राप्त झाले. 

- २०१४ साली ‘थोडंसं लॉजिक, थोडंसं मॅजिक’ या नाटकाला महाराष्टÑ राज्य सरकार आणि मराठी नाट्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त झाला. 

- २०१६ साली त्यांना गोवा राज्य सरकारचा ‘रंग सन्मान’ पुरस्कारही मिळाला आहे.

टॅग्स :goaगोवा