‘विर्डी’वर चार व आंबडगांव येथे एका धरणासाठी महाराष्ट्राकडून डीपीआर
By किशोर कुबल | Updated: June 20, 2023 21:02 IST2023-06-20T21:02:22+5:302023-06-20T21:02:36+5:30
छाननीसाठी गोवा सरकारकडे पाठवले

‘विर्डी’वर चार व आंबडगांव येथे एका धरणासाठी महाराष्ट्राकडून डीपीआर
पणजी : ‘विर्डी’वर चार व दोडामार्ग तालुक्यात आंबडगांव येथे एक मिळून पाच धरणे बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गोव्याला डीपीआर पाठवले आहेत. गोवा सरकारने या सविस्तर प्रकल्प अहवालांची (डीपीआर) छाननी करायची आहे.
विर्डीच्या उपनद्यांचे पाणी या धरणांसाठी वापरले जाईल. जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,‘या डीपीआरचा अभ्यास करण्यासाठी आम्ही समिती स्थापन करणार आहोत व ती प्रक्रिया सध्या चालू आहे. म्हादई जल तंटा लवादाने जो निवाडा दिला आहे त्या चौकटीत या गोर्षंटी आहेत की नाहीत, हे तपासले जाईल.दरम्यान, लवादाने पाणीवांटपाबाबत निवाडा दिल्यानंतर गोवा, कर्नाटक व महाराष्ट्रानेही सर्वोच्च न्यायालयासमोर आपल्याला पाणीवाटा वाढवून दिला जावा, यासाठी स्वतंत्र अर्ज केले आहेत.