चांगल्या सेवेतून डॉक्टर बनतात 'देवाचे मनीस': दिगंबर कामत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:57 IST2025-10-01T13:57:20+5:302025-10-01T13:57:35+5:30
कार्यक्रमाचे आयोजन प्रमुख डॉ. अजय पेडणेकर यांनी स्वागत केले.

चांगल्या सेवेतून डॉक्टर बनतात 'देवाचे मनीस': दिगंबर कामत
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : गोव्यातील वैद्यकीय सुविधा इतर राज्यांच्या तुलनेत खूप चांगल्या आहेत. मला लोक मस्करीने 'देवाचे मनीस' म्हणजेच देवाचा माणूस असे म्हणतात. जीवन वाचवणारी वैद्यकीय सेवा आणि संकटात असलेल्या रुग्णाकडे लक्ष दिल्याने लोक डॉक्टरांना 'देव माणूस' म्हणून संबोधू शकतो, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले.
वार्का येथे ३७ व्या गिमाकॉन २०२५ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी डॉ. गीता जोशी, डॉ. कीर्ती देसाई, डॉ. राकेश देशमाने, डॉ. दत्ताराम देसाई, डॉ. श्रद्धा मुळगावकर पाटील, डॉ. अभिजित शानभाग, डॉ. शिरीष मांडुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन प्रमुख डॉ. अजय पेडणेकर यांनी स्वागत केले. इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे ३७ व्या गिमाकॉनचे आयोजन फोंडा शाखेने वार्का येथे केले होते. यावेळी मंत्री कामत सांगितले, ही परिषद म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञानाचा उत्सव आहे. समाजात आरोग्य आणि शिक्षण हे दोन महत्त्वाचे घटक आहेत.
यावेळी दत्ताराम देसाई म्हणाले, आयएमएने पौगंडावस्थेतील वयोगटातील मुलांसाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. आयएमए गोवाचा अध्यक्ष या नात्याने मी सरकारला डॉक्टरांसाठी अधिक सतर्क सुरक्षा ठेवण्याची आणि डॉक्टरांच्या ड्युटी तासांचा विचार करण्याची विनंती करतो.
याप्रसंगी डॉ. मोहन धुमसकर, डॉ. संदेश चोडणकर आणि डॉ. शैलेशकुमार कामत यांचा त्यांच्या योगदानाबद्दल सत्कार झाला. पाटील म्हणाल्या की, डॉ. श्रद्धा मुळगावकर डॉक्टर म्हणून आपल्याला न्यूरो डायव्हर्सिटीबद्दल पुरेशी जागरूकता करणे आवश्यक आहे.
'माझा डॉक्टरांबद्दलचा अनुभव खूप चांगला आहे'
समाजात आरोग्य सेवा देण्यात डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची असते. गोव्यात इतर राज्यांसारखी अशी परिस्थिती नाही, येथे रुग्णाच्या नातेवाइकांचे डॉक्टरांशी भांडण होत नाही. आमच्याकडे सरकारी रुग्णालयांमध्ये पीआरओ आहेत. माझा डॉक्टरांबद्दलचा अनुभव खूप चांगला आहे.
अनेक लोक मला मस्करीने देवाचो मनीस म्हणतात, पण खरे पाहायला गेले, तर डॉक्टरांचे जीव वाचवण्याचे काम पाहता त्यांनाच 'देवाचे मनीस' म्हणून आम्ही संबोधू शकतो. कामत म्हणाले, की माझा देवावरील विश्वास दृढ आहे. माझ्या मते डॉक्टर हे देवाचे स्वरूप आहेत. गरीब माणसाला नेहमीच आरोग्य सेवेची गरज असते. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात उत्तम वैद्यकीय सुविधा आहेत.