शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

गोव्यात खाणींचा लिलाव नको : क्लॉड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 19:01 IST

गोव्यातील खनिज खाणींचा सरकारने लिलाव पुकारू नये. खनिज लिजांची मालकी सरकारने स्वत:कडेच ठेवावी आणि फक्त उत्खनन करण्याचे कंत्रट खासगी कंपन्यांना द्यावे, अशी नवी मागणी गोवा फाऊंडेशनने केली आहे.

पणजी : गोव्यातील खनिज खाणींचा सरकारने लिलाव पुकारू नये. खनिज लिजांची मालकी सरकारने स्वत:कडेच ठेवावी आणि फक्त उत्खनन करण्याचे कंत्रट खासगी कंपन्यांना द्यावे, अशी नवी मागणी गोवा फाऊंडेशनने केली आहे. तथापि, देशभरातील 21 राज्यांच्या खाण मंत्र्यांची आज शुक्रवारी पणजीतील पंचतारांकित हॉटेलात बैठक होत असून, या बैठकीत देशातील लिलाव पद्धतीच्या सद्यस्थितीबाबत चर्चा होणार आहे.केंद्रीय खाणमंत्री नरेंद्र सिंग तोमर हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. सर्वोच्च पातळीवर खाण व्यवसायाशी निगडीत विविध मुद्द्यांचा ऊहापोह करण्यात येणारी अशा प्रकारची ही पाचवी बैठक आहे. गोव्यातील बेकायदा खनिज खाण व्यवसायाविरुद्ध लढणारे डॉ. क्लॉड अल्वारिस यांनी आज सकाळी केंद्रीय खाण मंत्र्यांची बैठक घेऊन त्यांच्यासमोर गोव्यातील स्थिती मांडण्याचे ठरवले आहे. येथे पत्रकार परिषदेत गुरुवारी त्याविषयी बोलताना डॉ. अल्वारीस म्हणाले, की 2020 साली गोव्यातील 160 खनिज लिजे संपुष्टात येत आहेत. सरकारने या लिजांचा लिलाव न पुकारता लिजांची मालकी सरकारने स्वत:कडेच ठेवावी. त्यासाठी एखादी शासकीय कंपनी स्थापन करावी. फक्त उत्खनन करण्याचे कंत्राट देण्यासाठी निविदा जारी करावी किंवा उत्खननाचा तेवढाच लिलाव पुकारावा. यामुळे बेकायदा खाण धंदा बंद होईल.अल्वारिस म्हणाले, की मायनिंग सव्रेलन्स सिस्टीमद्वारे गोव्यात 12 बेकायदा खाण धंद्याच्या केसेस नोंद झाल्या. केंद्र सरकारच्या या सिस्टीममुळे गोव्यात झालेला 25 टक्के बेकायदा खाण धंदा कळून आला. गोव्याचा खाण उद्योग हा बेकायदा धंदा करत राहील हे यावरून स्पष्ट होते. गोवा सरकारने जिल्हा मिनरल निधीतील पैसा खाणग्रस्त लोकांच्या कल्याणासाठी वापरायला हवा. खाण मालकांच्या सोयीसाठी नव्हे. सध्या 140 कोटी रुपये या निधीमध्ये आहेत पण एकही पैसा सरकारने वापरला नाही. उलट हा निधी मायनिंग कॉरिडॉर बांधण्यासाठी वापरला जाईल, असे वाचनात येते. मायनिंग कॉरिडॉरचा वापर हा खनिज व्यावसायिकच करत असतात. शिरगाव, पाळी, वेळगे, सोनशी अशा विविध भागांतील लोकांना खनिज खाणींचा फटका बसला. त्यांना मिनरल फंडमधून मदत मिळायला हवी. सोनशीतील मुले खासगी बसने साखळीत शिकण्यासाठी जातात. या निधीमधून त्यांच्यासाठी सरकारने बस व्यवस्था सुरू करावी. जर मायनिंग कॉरिडॉरसाठी जिल्हा मिनरल फंड वापरला गेला, तर त्याविरुद्ध आम्ही न्यायालयात आव्हान देऊ.प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना जिल्हा मिनरल फाऊंडेशनकडून राबविण्याच्या विषयावरही आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे, असे अल्वारीस यांनी सांगितले. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ सध्या सर्व खनिज खाणींना कनसेन्ट टू ऑपरेट देत सुटले आहे. ते चुकीचे आहे. गोव्यातील खनिज खाण व्यवसायिक कुठच्याच कायद्यांना जुमानत नाहीत. आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केंद्रीय खाण मंत्र्यांच्या नजरेस आणून देऊ, असे अल्वारीस यांनी सांगितले. लिज नूतनीकरणाला आम्ही आव्हान दिले असून त्याबाबतचा निवाडा सर्वोच्च न्यायालयाकडून कोणत्याहीवेळी अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.