उच्च शिक्षण संचालनालयातर्फे बी.एड.साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 15:30 IST2024-04-17T15:30:26+5:302024-04-17T15:30:36+5:30
उच्च शिक्षण संचालयानालयाच्या https://www.dhe.goa.gov.in या संकेस्थळवर बीएड प्राॅस्पेक्टसची सॉफ्ट कॉपी उपलब्ध आहे.

उच्च शिक्षण संचालनालयातर्फे बी.एड.साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु
- नारायण गावस
पणजी : उच्च शिक्षण संचालनालयाच्या वतीने राज्यातील बी.एड. २०२४ - २०२६ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मागितल्या आहेत. उच्च शिक्षण संचालनालयाच्या वतीने निर्मला शिक्षण संस्था पणजी, जीव्हीएम शिक्षण संस्था महाविद्यालय फोंडा आणि पीईएस शिक्षण महाविद्यालय फोंडा या शैक्षणिक संस्थामध्ये हा कोर्स करता येत असून यासाठी या संस्थानी ऑनलाईन अर्ज सुरु केले आहेत.
उच्च शिक्षण संचालयानालयाच्या https://www.dhe.goa.gov.in या संकेस्थळवर बीएड प्राॅस्पेक्टसची सॉफ्ट कॉपी उपलब्ध आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी यासाठी संस्थामध्ये हार्ड कॉपी न देता ऑनलाईन अर्ज भरावे, असे आवाहनही उच्च शिक्षण संचालनालयाने केले आहे. अर्ज करण्याची तारीख १६ एप्रिल ते १ मार्च २०२४ पर्यंत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण संचालनालयाकडे संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.