दिंडी उत्सव हे मडगावासीयांचे भूषण: दामू नाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 07:43 IST2025-10-27T07:42:20+5:302025-10-27T07:43:33+5:30
दामबाबाले घोडे संस्थेतर्फे दिंडी पथक कार्यशाळा

दिंडी उत्सव हे मडगावासीयांचे भूषण: दामू नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : मडगावच्या दिंडी उत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. सुमारे ११६ वर्षाची परंपरा या उत्सवाला लाभली आहे. हे मडगाववासीयांचे भूषण आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले. येथील रवींद्र भवन येथे दामबाबाले घोडे संस्थेच्या वतीने आयोजित दिंडी पथक कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, उपनगराध्यक्षा बबिता नाईक, दक्षिण गोवा जिल्हा भाजपा अध्यक्ष प्रभाकर गावकर, नगरसेविका श्वेता लोटलीकर, नगरसेवक महेश आमोणकर, दामोदर वरक, राजू नाईक, मिलाग्रीना गोम्स, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष मनोहर बोरकर उपस्थित होते. दिंडी उत्सवाच्या आयोजनात युवकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. युवकांनी पुढे येऊन दिंडी परंपरा पुढे चालविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी नवनवीन संकल्पना, नवीन प्रयोग करण्याची नितांत गरज आहे, असेही ते म्हणाले.
या कार्यशाळेत सागर गावडे बोरकर, मंदार गावडे, चेतन नाईक, अजय सतरकर, साईश म्हामल यांनी शास्त्रोक्त दिंडीचे धडे दिले. कार्यशाळेत सुमारे १००हून अधिक प्रशिक्षणार्थीनी भाग घेतला.