लहान बंदरांचे डिजिटायझेशन; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समझोता करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 11:01 IST2026-03-17T11:00:30+5:302026-03-17T11:01:06+5:30

सरकारचे महत्त्वपूर्ण पाऊल

digitization of small ports memorandum of understanding signed in the presence of the cm pramod sawant | लहान बंदरांचे डिजिटायझेशन; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समझोता करार

लहान बंदरांचे डिजिटायझेशन; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समझोता करार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोवा सरकारचा बंदर कप्तान विभाग आणि रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. लहान बंदरांच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून कार्यक्षमता सुधारण्याच्या उद्देशाने गोवा सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत करारावर सह्या झाल्या. कार्यक्रमाला बंदर कप्तान खात्याचे मंत्री दिगंबर कामत हेही उपस्थित होते. या करारामुळे गोव्यातील लहान बंदरांची माहिती-तंत्रज्ञान आणि डिजिटल पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यात मदत होणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित प्रणाली, सुरक्षित क्लाऊड सेवा तसेच अधिक सक्षम डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून बंदरांचे कामकाज अधिक आधुनिक आणि कार्यक्षम बनविण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमामुळे बंदरांतील प्रशासन, डेटा व्यवस्थापन आणि सेवा प्रणाली अधिक वेगवान व पारदर्शक होणार असून, भविष्यातील तांत्रिक गरजांनाही त्यातून आधार मिळणार आहे.

मुख्यमंत्री सावंत यांनी पुढे सांगितले की, हा करार तंत्रज्ञानाधारित प्रशासनाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल असून गोव्याच्या सागरी पायाभूत सुविधांना अधिक बळकटी देण्यास तो उपयुक्त ठरणार आहे. गोवा सरकार बंदर व्यवस्थापन, लॉजिस्टिक्स आणि डिजिटल सेवा अधिक सक्षम करण्यासाठी अशा भागीदारींवर भर देत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
 

Web Title : गोवा के छोटे बंदरगाह होंगे डिजिटल; मुख्यमंत्री की उपस्थिति में समझौता

Web Summary : गोवा सरकार ने छोटे बंदरगाहों को डिजिटल बनाने के लिए रेलटेल के साथ साझेदारी की है, जिससे आधुनिक तकनीक और एआई से दक्षता बढ़ेगी। मुख्यमंत्री प्रमोद सावंत की उपस्थिति में समझौते पर हस्ताक्षर किए गए, जिसका उद्देश्य आईटी बुनियादी ढांचे को मजबूत करना, डेटा प्रबंधन में सुधार करना और बंदरगाह संचालन के लिए अधिक पारदर्शी और कुशल प्रणाली बनाना है।

Web Title : Goa's Small Ports to Go Digital; Agreement Signed in CM's Presence

Web Summary : Goa government partners with RailTel to digitize small ports, enhancing efficiency with modern technology and AI. The agreement, signed in the presence of Chief Minister Pramod Sawant, aims to strengthen IT infrastructure, improve data management, and create a more transparent and efficient system for port operations.