शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

म्हादई आंदोलनासाठी काँग्रेसची डिजिटल मोहीम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 14:42 IST

गोवा प्रदेश काँग्रेस समितीतर्फे सुरू करण्यात आलेल्या "म्हादई जागोर" आंदोलनाला अधिक चालना देण्याचा भाग म्हणून डिजिटल मोहीम सुरू करण्यात आली आहे.

पणजी - गोवा प्रदेश काँग्रेस समितीतर्फे सुरू करण्यात आलेल्या "म्हादई जागोर" आंदोलनाला अधिक चालना देण्याचा भाग म्हणून डिजिटल मोहीम सुरू करण्यात आली आहे. कर्नाटकच्या कळसा, भंडुरा प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने दिलेला दाखला रद्द करावा यासाठी आंदोलन प्रखर करण्याचा हा भाग आहे. पक्षाचे प्रवक्ते ऊर्फान मुल्ला यांनी ही माहिती दिली.  

डिजिटल कॅम्पेनच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी एक पोस्टर प्रकाशित करण्यात येणार असून गोव्यातील बारा तालुक्यांच्या नावाने बारा पोस्टर समाजमाध्यमांवर टाकण्यात येणार आहेत. सदर पोस्टरवर गोव्यातील भाजपा सरकारच्या भ्रष्ट कारभाराबद्दल भाष्य केले जाणार असून, म्हादई प्रश्नावर आपली खुर्ची सांभाळण्यासाठी गप्प बसलेल्या मंत्र्यांच्या भानगडी बाहेर काढण्यात येणार आहेत. गोव्यातील लोकांनी म्हादई प्रश्नावर संवेदनशील बनणे गरजेचे आहे, म्हादईप्रश्नी भाजपाच्या धोरणा विरोधात राग व संताप व्यक्त करणे गरजेचे आहे. कर्नाटकाचा डाव यशस्वी झाल्यास गोव्याची मांडवी नदी आटेल व संपुर्ण गोवाच वाळवंट बनणार आहे याची जाणीव लोकांनी ठेवणे गरजेचे आहे. 

काँग्रेस पक्ष म्हादई प्रश्नावर जन आंदोलनाचे समर्थपणे नेतृत्व करणार असून जीवनदायीनी म्हादईचे अपहरण करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी लोकांना आंदोलन करण्यास मिळावे यासाठी सरकारने त्वरीत कलम 144 मागे घ्यावे व लोकांना मोकळीक द्यावी, असे ऊर्फान मुल्ला यांनी म्हटले आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे हा लोकांचा अधिकार असून, सरकारने लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये, असे मुल्ला यांनी म्हटले आहे.

म्हादई नदीच्या पाण्याच्या वादात केंद्र सरकार कर्नाटकच्या बाजूने झुकू लागल्याने गोवा सरकारचा केंद्राशी संघर्ष होणे हळूहळू अटळ बनले आहे. गोवा सरकार हा संघर्ष खरोखर गंभीरपणे व प्रामाणिकपणे करील की गोमंतकीयांना दाखविण्यापुरताच संघर्ष मर्यादित असेल हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

गोव्यातही भाजपाचेच सरकार आहे व कर्नाटकमध्येही भाजपा सरकार अधिकारावर आहे. म्हादई नदीचा उगम कर्नाटकात होतो पण या नदीचा बहुतांश भाग हा गोव्यातून वाहतो. गोव्यातील अनेक पाणी पुरवठा प्रकल्प, शेती वगैरे म्हादई नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. म्हादई नदीचे पाणी कर्नाटकात वळवून तिथे जलविद्यूत प्रकल्प उभे करण्याची कर्नाटकची योजना आहे. गोवा सरकार यास सातत्याने विरोध करत आले व कायद्याची लढाई न्यायालयातही पोहचली. मात्र केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने अलिकडेच म्हादई नदीचे पाणी काही प्रमाणात वळविण्यास कर्नाटकला मंजुरी दिलेले पत्र दिले. त्याविषयीची घोषणा ट्विटरवरून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. यामुळे गोव्यात जावडेकर यांच्याविरुद्ध गोवा सरकारविरुद्धही संताप व्यक्त होऊ लागला. यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची अडचण झाली. 

 

 

टॅग्स :goaगोवाWaterपाणीcongressकाँग्रेस