डिचोलीत युवकाचा अपघाती मृत्यू
By Admin | Updated: July 20, 2014 01:41 IST2014-07-20T01:38:31+5:302014-07-20T01:41:01+5:30
डिचोली : डिचोली ते मये मार्गावरील शासकीय तंत्रनिकेतनजवळ कार व दुचाकीत झालेल्या भीषण अपघातात धबधबा-डिचोली येथील सिद्धकाम प्रभाकर राऊळ

डिचोलीत युवकाचा अपघाती मृत्यू
डिचोली : डिचोली ते मये मार्गावरील शासकीय तंत्रनिकेतनजवळ कार व दुचाकीत झालेल्या भीषण अपघातात धबधबा-डिचोली येथील सिद्धकाम प्रभाकर राऊळ या १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.
हा अपघात सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झाला. सिद्धकाम मोटरसायकलने (क्र. जीए ०४ जे १३३२) मये येथून डिचोलीच्या बाजूने येत होता, तर राजेंद्र परब (केळबायवाडा-मये) हा कारने (क्र. जीए ०४ सी ८८८२) मये येथे जात असताना दोन्ही वाहनांत टक्कर झाली. या धडकेत सिद्धकाम रस्त्यावर फेकला गेला व त्याच्या डोक्याला जबर मार बसला.
घटनेची माहिती डिचोली पोलीस, तसेच १०८ रुग्णवाहिकेला देण्यात आली. ‘१०८’ने त्याला डिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून म्हापसा येथे आझिलोत पाठविण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
हवालदार विष्णू गावस यांनी पंचनामा केला. पुढील तपास उपनिरीक्षक विठ्ठल माजीक करत आहेत. मृतदेह बांबोळी येथे शवागारात ठेवण्यात आला आहे. उत्तरीय तपासणीनंतर तो रविवारी नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल, असे पोलीस स्थानकातून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)