शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी   
2
असं काय झालं की 'या' देशाने तालिबानी अधिकाऱ्यांना थेट आपल्या देशात 'नो एन्ट्री' म्हटलं?
3
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
4
फडणवीस म्हणाले,१० फेऱ्या सुरू, रेल्वेला आयोगाची परवानगी हवी; उरण-नेरूळ-बेलापूर फेऱ्या वाढणार
5
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
6
बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक  
7
अनिल अंबानी यांची आणखी १,१२० कोटींची मालमत्ता जप्त; मुदत ठेवी, शेअर्सचाही समावेश
8
SMAT 2025 : डॉक्टरांमुळे इंदूरमध्ये क्रिकेटर्सची गैरसोय! आता पुण्यात रंगणार टी-२० चा थरार; कारण...
9
एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
10
संबंध नसलेल्यांचे एसआरएवर नियंत्रण, राजकारण्यांना उच्च न्यायालयाचा टोला
11
IndiGo: पाणी नाही, जेवण नाही, कॅप्टनही गायब; इंडिगोच्या प्रवाशानं काढलेला व्हिडीओ एकदा बघाच!
12
Accident: अयोध्येला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात, जळगावची महिला ठार
13
१२ डिसेंबरपासून उघडतोय 'हा' आयपीओ; आतापासूनच ₹३५० च्या नफ्यावर पोहोचलाय GMP
14
Dhurandar Box Office: रणवीर सिंगच्या 'धुरंदर'ने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला! बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
15
Airfares Soar: मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले
16
लग्नाचे कायदेशीर वय गाठलेले नसले तरीही ते दोघे स्वेच्छेने लिव्ह-इनमध्ये राहू शकतात; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
17
५३१ धावांचं आव्हान, सातव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, विंडीजकडून जोरदार पाठलाग, अखेरीस असा लागला निकाल  
18
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
19
धक्कादायक माहिती! गुजरातमधील मतदार याद्यांत १७ लाख मृतांची नावे
20
घटस्फोटाच्या ४ महिन्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ, फोटो आला समोर
Daily Top 2Weekly Top 5

डिचोली पोलिस स्थानक ठरले उत्कृष्ट; देशात पाचव्या स्थानावर, मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 11:17 IST

गोवा पोलिस आणि गृह खात्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: डिचोली पोलिस स्थानक हे देशातील पाचवे उत्कृष्ट पोलिस स्थानक ठरले आहे. केंद्रीय गृह खात्याने २०२५ मधील देशातील उत्कृष्ट पोलिस स्थानकांची यादी जाहीर केली असून त्यात त्याचा समावेश केला आहे. गोवा पोलिस आणि गृह खात्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.

तत्कालीन उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता, पोलिस उपअधीक्षक श्रीदेवी बी. व्ही. तसेच पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्थानकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे, गुन्ह्यांचा तपास आदी निकषांवर डिचोली पोलिस स्थानक पात्र ठरले आहे.पोलिस स्थानकात पायाभूत सुविधांमध्ये मुलांसाठी अनुकूल खोली, जीम, कॅटिन, स्वच्छ बॅरेक इत्यादींचा समावेश केला आहे. सप्टेंबरमध्ये गृह मंत्रालयाच्या पथकाने सर्व्हेक्षण केलेले.

पहरगावची बाजी

गृह मंत्रालयाने जारी केलेल्या देशातील उत्कृष्ट पोलिस स्थानकांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर दक्षिण अंदमान निकोबार बेटावरील पहरगाव पोलिस स्थानक, दुसऱ्या क्रमांकावर उत्तर दिल्लीतील गाजीपूर पोलिस स्थानक, तिसरा क्रमांक रायचूर-कर्नाटक येथील कविताल पोलिस स्थानकाचा तर चौथा क्रमांक हा सरेकेला-झारखंड येथील चौका पोलिस स्थानकाने प्राप्त केला आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या देशातील उत्कृष्ट पोलिस स्थानकाच्च्या यादीनुसार डिचोली पोलिस स्थानक देशातील पाचव्या क्रमाकांवर येणे ही गोव्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. गोवा सरकार हे नेहमीच दक्ष तसेच नागरिक केंद्रीत धोरणावर काम करते. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Dicholi Police Station Ranks Fifth Best Nationally; CM Congratulates Team

Web Summary : Dicholi Police Station secured fifth position nationally in 2025, recognized by the Union Home Ministry. Achievements include crime control, investigations, and infrastructure like gyms and improved facilities. Goa CM praised citizen-centric policing.
टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसPoliticsराजकारणPramod Sawantप्रमोद सावंत