देवेंद्र फडणवीस आजपासून दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 14:09 IST2021-09-20T14:08:52+5:302021-09-20T14:09:27+5:30
रेल्वे राज्यमंत्री तथा वस्रोद्योगमंत्री दर्शना जार्दोश गोव्यात दाखल झाल्या आहेत. तर फडणवीस यांच्यासोबत भाजपचे गोवा निवडणुकीचे सहप्रभारी केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी व पक्षाचे गोवा प्रभारी सी. टी. रवी हेही येणार आहेत.

देवेंद्र फडणवीस आजपासून दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर
पणजी : भाजपने गोव्यात निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज सोमवारी २0 रोजी दोन दिवसांच्या दौऱ्यावर गोव्यात दाखल होत आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी रणनीतीवर चर्चा करण्यासाठी फडणवीस गोवा दौऱ्यावर येत आहेत.
रेल्वे राज्यमंत्री तथा वस्रोद्योगमंत्री दर्शना जार्दोश गोव्यात दाखल झाल्या आहेत. तर फडणवीस यांच्यासोबत भाजपचे गोवा निवडणुकीचे सहप्रभारी केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी व पक्षाचे गोवा प्रभारी सी. टी. रवी हेही येणार आहेत.
येत्या चार पाच महिन्यात गोव्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे त्या अनुषंगाने पक्षाच्या तयारीचा आढावाही घेतला जाईल. फडणवीस तसेच वरील अन्य नेते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच मंत्रिमंडळातील त्यांचे अन्य सहकारी, भाजप आमदार, पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधतील. भाजप युवा आघाडी, महिला मोर्चा, ओबीसी विभाग, अल्पसंख्यांक विभाग आदी आघाड्यांबरोबरच बूथ स्तरावरही ते संवाद साधतील.
फडणवीस यांनी बिहार विधानसभेत निवडणूक प्रभारी म्हणून भाजपसाठी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. २0१४ ते २0१९ या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली आहे.