सत्तरीतील झेडपीच्या चारही जागा जिंकण्याचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 12:26 IST2025-10-25T12:25:54+5:302025-10-25T12:26:24+5:30
मंत्री विश्वजीत राणे यांच्याकडून स्थानिक लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन : पंतप्रधानांची विचारधारा घरोघर पोहचवणार, युवकांचा प्रश्न सोडवणार

सत्तरीतील झेडपीच्या चारही जागा जिंकण्याचा निर्धार
लोकमत न्यूज नेटवर्क, सत्तरी : सत्तरी तालुका व उसगाव असे मिळून चार झेडपी मतदारसंघ यावेळीही मोठ्या मतांच्या आघाडीने जिंकण्याचा निर्धार काल शुक्रवारी झालेल्या बैठकीत करण्यात आला.
वाळपईचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सत्तरी तालुक्यातील झेडपी सदस्य, काही पंच, सरपंच, उपसरपंच, आपले प्रमुख आमदार तथा कार्यकर्ते यांची एकत्रित बैठक घेतली. मंत्री राणे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारधारा घरोघर पोहचवूया असे बैठकीत ठरले. झेडपी निवडणुका येत्या १३ डिसेंबर रोजी होतील. सर्वांनी त्यासाठी जोरात काम करावे असे बैठकीत ठरले. याा बैठकीला वाळपईच्या नगराध्यक्षांसह झेडपी सदस्य सगुण वाडकर, पिसुर्ले, खोतोडे व अन्य पंचायतींचे सरपंच उपस्थित होते.
'युवकांचे सर्व प्रश्न सोडविले जातील'
दरम्यान, सत्तरी तालुका व उसगावमधील युवकांचे सर्व प्रश्न सोडविले जातील. युवकांची शक्ती हीच आमची शक्ती आहे. युवा शक्ती आम्ही संघटीत करत आहोत. सत्तरी तालुक्याचा विकास व उसगावचा विकास हे प्रमुख ध्येय आहे असे राणे म्हणाले. युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न सोडवला जाईल. केंद्रात व गोव्यात भाजपचे सरकार असून भाजपच्याच राजवटीत विकास कामे जलदगतीने होतात असे विश्वजीत राणे म्हणाले. बैठकीनंतर विजयी चिन्ह दाखवताना आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व स्थानिक लोकप्रतिनिधी. बैठकीला उपस्थित सत्तरी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी.
आतापासूनच कामाला लागण्याचा सल्ला
भाजपचे चारही उमेदवार सत्तरी व उसगावमध्ये मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणूया, त्यासाठी आतापासूनच कामाला लागा असा सल्ला मंत्री राणे यांनी दिला. पर्ये व वाळपई या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण चार झेडपी मतदारसंघ येतात.