मुतालिकावरील प्रवेश बंदी हटवा, हिंदू जनजागृतीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 22:17 IST2018-03-15T22:17:34+5:302018-03-15T22:17:34+5:30
रामसेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गोवा सरकारने केलेली प्रवेशबंदी त्वरित मागे घ्यावी अशी मागणी हंदू जनजागृती समितीने केली आहे. या मागणीसाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले.

मुतालिकावरील प्रवेश बंदी हटवा, हिंदू जनजागृतीची मागणी
पणजी: रामसेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गोवा सरकारने केलेली प्रवेशबंदी त्वरित मागे घ्यावी अशी मागणी हंदू जनजागृती समितीने केली आहे. या मागणीसाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले.
मुतालिक यांच्यावर टाकण्यात आलेली बंदी ही बेकायदेशीर असून त्यासाठी देण्यात आलेले कारणही बोगस असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. २०१४ मध्ये सरकारने ही बंदी टाकण्यात आली होती. नंतर ती प्रत्येक सहा महिन्याने वाढवित २०१८ पर्यंत बंदी कायम ठेवली आहे. हा प्रकार लोकशाही विरोधी असल्याचा दावाही संघटनेने केला आहे.
मगळूर पब हल्ला प्रकरणी मुतालिक आणि राम सेनेला न्यायालयात निर्दोष ठरविल्यानंतरही मुतालिक व त्यांच्या कार्यकर्त्यांना गोव्यात येण्यास बंदी का केली जात आहे याचेही स्पष्टीकरण संघटनेने मागितले आहे.