शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्ग विलिनीकरणाची मागणी निरर्थक : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 19:29 IST

महाराष्ट्र सरकार सक्षम : तालुक्याच्या विकासासाठी अनेक प्रकल्प

सचिन खुटवळकर/पणजी : दोडामार्ग तालुका गोव्यात विलीन करावा, अशी मागणी जोर धरत असतानाच सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी ही मागणी निरर्थक असल्याचे सांगितले. तालुक्याच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असून अनेक प्रकल्प येऊ घातले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.काही लोकांना अधूनमधून अशा कुरापती काढण्याची सवय असून तालुक्यातील बहुसंख्य लोकांना महाराष्ट्राबद्दल अभिमान असल्याने विलिनीकरणाच्या मुद्द्याला फारसे महत्त्व देण्याची गरज नसल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले. अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान गोव्यातील भाजपच्या काही मंत्र्यांनी दोडामार्गमधील मतदारांना आमिष दाखविताना गोव्यातील सुविधांचा लाभ देण्याचे कबूल केले होते. या नेत्यांनी केलेल्या बुद्धिभेदामुळेच काही तरुण गोव्यात विलिनीकरण करण्याची मागणी करू लागले आहेत. तेथील तरुण गोव्यात रोजगारासाठी जातात व आरोग्य सुविधांसाठी गोव्यावर अवलंबून राहावे लागते, यात नक्कीच तथ्य आहे; परंतु लवकरच आडाळी येथे औद्योगिक वसाहत उभी राहणार असून पाच उद्योजकांनी नोंदणीही केली आहे. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न बºयाच अंशी मिटणार आहे. आरोग्य सेवेबाबत महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच गोवा सरकारशी चर्चा करून तेथील रुग्णालयांत सिंधुदुर्गमधील रहिवाशांना आरोग्य योजनेचा लाभ घेता येईल, याची काळजी घेतली आहे. त्यामुळे विलिनीकरणाच्या मागणीआडून मांडला जाणारा आरोग्य सेवेचा मुद्दाही तकलादू ठरतो, असे केसरकर म्हणाले.तिळारी येथील धरण क्षेत्र परिसरासह दोडामार्ग तालुक्यातील विविध भागांत पर्यटन प्रकल्प विचाराधीन आहेत. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. महाराष्ट्र सरकारच्या कृषी योजनांचा लाभ घेतल्यास परराज्यातच नव्हे, तर परजिल्ह्यातही रोजगारासाठी जाण्याची वेळ तरुणांवर येणार नाही. भेडशी येथे सुसज्ज आरोग्य केंद्र उभारले जात आहे. दोडामार्ग येथील आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचा प्रस्तावही प्रत्यक्षात येईल, असे केसरकर यांनी सांगितले.

गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करा!गोव्यात विलिनीकरण व्हावे, अशी मागणी करणा-यांनी आधी गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करावा, असे केसरकर म्हणाले. खाणबंदी, पर्यटन उद्योगाला लागलेली उतरती कळा आदी कारणांमुळे गोवा सरकारवर आर्थिक कसरती करण्याची वेळ आली आहे. मी वैयक्तिकदृष्ट्या गोव्याच्या व गोमंतकीयांच्या हिताचाच विचार करणारा माणूस आहे. मात्र, तेथील स्थितीचा आढावा घेतल्यास दोडामार्गवासीयांना सत्यस्थिती समजून येईल. त्यांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

विलिनीकरणासंबंधी चर्चेसाठी रविवारी बैठकदोडामार्ग तालुका गोव्यात विलीन करण्याच्या चळवळीची दिशा ठरविण्यासाठी रविवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी दोडामार्ग येथील गणेश मंदिरात सकाळी १0 वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. तालुका निर्मितीनंतर चार विधानसभा निवडणुका झाल्या. मात्र, तालुक्याला नेहमीच विकासाच्या प्रक्रियेतून डावलले गेले. या संदर्भात वाचा फोडण्यासाठी तसेच विलिनीकरणाबाबतची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी ही बैठक आयोजित केली आहे.

टॅग्स :goaगोवाkonkanकोकण