लहानशा गोव्यात तब्बल 13 रस्त्यांचे पट्टे ठरतायेत मृत्यूचे सापळे; दर 30 तासात एक अपघाती बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 18:58 IST2019-08-20T18:58:22+5:302019-08-20T18:58:33+5:30
गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचाही समावेश

लहानशा गोव्यात तब्बल 13 रस्त्यांचे पट्टे ठरतायेत मृत्यूचे सापळे; दर 30 तासात एक अपघाती बळी
मडगाव: अवघे 3702 चौ. मी. क्षेत्रफळ असलेल्या लहानशा गोव्यात तब्बल 13 रस्त्यांचे पट्टे अपघातप्रवण क्षेत्र असून त्यात राष्ट्रीय महामार्गासह राज्य महामार्गाचाही समावेश आहे. हक्स इंजिनियर्स या कंपनीने तयार केलेल्या अहवालात ही गोष्ट समोर आली आहे. गोव्यात दरवर्षी सरासरी 280 ते 320 लोकांचे रस्ता अपघातात बळी जात असतात.
या अपघातप्रवण क्षेत्रबद्दल चर्चा करण्यासाठी नुकतीच गोवा पोलीस, वाहतूक खाते आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. वाहतूक संचालक राजन सातार्डेकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, या अपघातप्रवण पट्टय़ात अनमोड ते पणजी, फर्मागुडी ते मुरगाव व्हाया बोरी, पणजी ते पोळे, कुठ्ठाळी ते मुरगाव तसेच पणजी ते पत्रदेवी या रस्त्यांचा समावेश आहे. यातील पणजी ते पोळे आणि पणजी ते पत्रदेवी हा राष्ट्रीय हमरस्त्याचा भाग आहे.
हक्स या करासवाडा ते वाळपई, अस्नोडा ते महाराष्ट्र राज्य सीमा व्हाया दोडामार्ग, साखळी ते केरी, बोरी ते मडगाव, बोरी ते कुडचडे, धारबांदोडा ते कुडचडे आणि शिरोडा ते कुडचडे हे रस्तेही धोकादायक असून या रस्त्यात सुधारणा आवश्यक असल्याचे म्हटले आहे. कंपनीच्या शिफारसीनुसार सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे हे दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
वाहतूक पोलीस विभाग यांच्याकडून उपलब्ध झालेल्या अपघाताच्या आकडेवारीवरुन ही अपघातप्रवण क्षेत्रे ठरविण्यात आली असून ज्या जागेवर दहापेक्षा जास्त अपघात झाले आहेत त्या रस्त्यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीनेही राज्य सरकारांना हमरस्त्यांवरील देखरेख वाढविण्याची सुचना केली आहे. अतिवेगात जाणा:या वाहनांवर अंकुश ठेवण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गोव्यात दर 30 तासामागे रस्ता अपघातात एका माणसाचा बळी जात असून त्यात गोव्यात येणा:या पर्यटकांचाही समावेश आहे. बहुतेक अपघातीबळी दुचाकी स्वारांचे जात असून बहुतेकवेळा हेल्मेटशिवाय वाहन चालवणो या स्वारांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले आहे.