मुलीचे प्रेम बापाला खटकले; सलूनमधून तरुणास उचलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 14:42 IST2023-10-11T14:40:13+5:302023-10-11T14:42:59+5:30
अपहरणकर्त्या सर्वांना अटक केली आहे.

मुलीचे प्रेम बापाला खटकले; सलूनमधून तरुणास उचलले
लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा : मुलीशी असलेले कथित प्रेमसंबंध बापाला सहन न झाल्याने त्यांनी आपल्या तीन साथीदारांसह बंगळुरातून थेट मयडे येथे येऊन तेथील सलूनमधून युवकाचे परस्पर अपहरण केले. मात्र या अपहृत युवकाची काही तासाच्या तपासानंतर म्हापसा पोलिसांनी जुने गोवे पोलिसांच्या सहकार्याने सुटका केला. तसेच अपहरणकर्त्या सर्वांना अटक केली आहे.
नवशाद अहमद (४५), यासिन अली बैग (२१), अहमद शरीफ, नवाज एम डी (सर्वजण बंगळुर) यांचा समावेश आहे. या सर्व संशयिताविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४५१, ३४२, ३६५ व ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना दि. १० ऑक्टोबर रोजी दुपारी २च्या सुमारास घडली.
जुनीद अली हा बंगळुरमध्ये सलूनमध्ये काम करायचा. तिथेच त्याची संशयिताच्या मुलीशी ओळखी झाली व नंतर दोघांचे सूत जुळले. जुनीदचे अपहरण करुन त्याला बंगळूरला नेण्याचा त्याचा डाव होता, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
याप्रकरणी झाकीर अहमद (२९, रा. पर्वरी व मूळ उत्तर प्रदेश) हे फिर्यादी आहेत. वरील चारही संशयितांनी फिर्यादींचा पुतणा जुनीद अली (२२) याला मयडे येथील हेअर कटिंग सलूनमधून अपहरण करुन त्याला कारमध्ये डांबले.
संशयितांनी तरुणाला कर्नाटक नोंदणीकृत कारमधून नेल्याची तक्रार फिर्यादी झाकीर यांनी म्हापसा पोलिसांत दिली. म्हापसा पोलिस तपास गतीमान जुने गोवे पोलिसांना सर्तक केले. त्याचवेळी पोलिसांनी संशयितांची कार अडवून ती ताब्यात घेतली