सायबर भामट्यांचा सुळसुळाट; साडेतीन कोटींचा गंडा, 'डिजिटल अरेस्ट', गुंतवणुकीच्या आमिषाने लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 13:10 IST2026-03-28T13:10:09+5:302026-03-28T13:10:09+5:30

यापैकी डिजिटल अरेस्ट प्रकरणात एका संशयितास केरळमधून अटक करण्यात आली.

cyber scammers 3 crore 50 lakh rupees scam digital arrest loot with the lure of investment | सायबर भामट्यांचा सुळसुळाट; साडेतीन कोटींचा गंडा, 'डिजिटल अरेस्ट', गुंतवणुकीच्या आमिषाने लूट

सायबर भामट्यांचा सुळसुळाट; साडेतीन कोटींचा गंडा, 'डिजिटल अरेस्ट', गुंतवणुकीच्या आमिषाने लूट

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : डिजिटल अरेस्टची भीती घालून तसेच क्रिप्टोकरन्सी योजनेत गुंतवणूक केल्यास जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून दोन वेगवेगळ्या प्रकरणात सुमारे साडेतीन कोटींचा गंडा घातल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यापैकी डिजिटल अरेस्ट प्रकरणात एका व्यक्तीची ९०.८५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तर क्रिप्टोकरन्सी योजनेत गुंतवणूक करायला लावून जादा व्याजाच्या नफ्याच्या २.४८ कोटींचा गंडा घातला आहे.

यापैकी डिजिटल अरेस्ट प्रकरणात एका संशयितास केरळमधून अटक करण्यात आली. तर गुंतवणूक फसवणूक प्रकरणात चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवला. पहिल्या प्रकरणात गोवासायबर क्राइम विभागाने 'डिजिटल  अरेस्ट'च्या नावाखाली ९०.८५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोहम्मद रासिक पुलिक्कल (वय २१) या संशयिताला केरळमधून अटक केली. संशयित मोहम्मदने तक्रारदाराशी व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून स्वतःला दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाचा (सीबीआर) अधिकारी असल्याचे भासवले. तुमचा वैयक्तिक माहितीचा गैरवापर व मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभागाचा आरोप असल्याचे तक्रारदाराला 'डिजिटल अरेस्ट' केल्याचे सांगितले.

प्रकरण मिटवण्यासाठी पैसे भरण्यासाठी दबाव टाकला. अटकेच्या भीतीने तक्रारदाराने संशयिताच्या विविध खात्यांमध्ये ९०.८५ लाख रुपये भरले. नंतर आपण फसवलो गेल्याने कळताच याप्रकरणी पीडित व्यक्तीने सायबर क्राइम पोलिसांत तक्रार दाखल केली.

दरम्यान, फसवणुकीची रक्कम २.४८ कोटी रुपये आहे. त्यानुसार वारंवार पाठपुरावा करूनही संशयितांकडून रक्कम परत दिली जात नसल्याने गुंतवणुकदारांनी पोलिसांत धाव घेतली. आर्थिक गुन्हे विभागाच्या पोलिस अधीक्षक अर्शी आदिल व उपअधीक्षक फ्रान्सिस कॉर्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास सुरू आहे.

सायबर पोलिसांना तपासात संशयित केरळमधील मलप्पुरम येथे असल्याची माहिती मिळाली. उपनिरीक्षक नवीन नाईक यांच्या पथकाने तेथून त्यास अटक केली. संशयिताच्या बँक खात्यात २५ लाख रुपये आढळले आहेत. तर उर्वरित रक्कम त्याने अन्यत्र वळवल्याचे समोर आले आहे.

जादा परताव्याचे आमिष

क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणात संशयितांनी 'ओरिस कॉईन' या योजनेत गुंतवणूक करण्यास सांगत जास्त नफ्याचे आमिष दाखवले. तक्रारीनुसार १ डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२५ या कालावधीत संशयितांनी संगनमत करून 'ओरिस कॉईन' नावाची ठेव गुंतवणूक योजना ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे सुरू केली. जास्त परताव्याचे आमिष दाखवत लोकांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. मात्र, मुदत पूर्ण झाल्यानंतरही परतावा न देता आरोपींनी फसवणूक केली.

'ओरिस कॉईन'च्या नावावर २.४८ कोटींची फसवणूक

'ओरिस कॉईन' या क्रिप्टोकरन्सी योजनेत गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळेल असे आमिष दाखवून काही गुंतवणूकदारांना सुमारे २.४८ कोटी रुपयांना गंडवल्याप्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौघांविरुद्ध गुन्हा नोंद केला. तरुण त्रिखा व राहुल खुराना (दोघे रा. दिल्ली) तसेच रवी ठाकूर व राहुल जाधव (दोघे रा. नवी मुंबई) अशी संशयितांची नावे आहेत. मये येथील एकाने याबाबत तक्रार दिली. मये, डिचोली येथील एका व्यक्तीने या संशयितांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंद केली.
 

Web Title : साइबर धोखाधड़ी बढ़ी: डिजिटल अरेस्ट, निवेश से ₹3.5 करोड़ की लूट।

Web Summary : गोवा में साइबर अपराधियों ने डिजिटल अरेस्ट और क्रिप्टोकरेंसी निवेश योजनाओं के माध्यम से पीड़ितों को ₹3.5 करोड़ का चूना लगाया। पुलिस ने एक संदिग्ध को गिरफ्तार किया और जांच जारी है।

Web Title : Cyber Frauds Surge: Scammers Loot ₹3.5 Crore via Digital Arrest, Investments.

Web Summary : Cybercriminals in Goa defrauded victims of ₹3.5 crore through digital arrest scams and cryptocurrency investment schemes promising high returns. Police arrested one suspect and are investigating others involved in these fraudulent activities.