कस्टम अधिकाऱ्यांनी गोव्याच्या दाबोळी विमानतळावर पकडले २१ लाख ७८ हजार रुपयांचे तस्करीचे सोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 11:01 PM2021-04-28T23:01:04+5:302021-04-28T23:01:36+5:30

दाबोळीवर तस्करीचे सोने घेऊन पकडलेल्या त्या दुसºया इसमाने हे सोने हैद्राबात येथे आपल्या ताब्यात घेतल्यानंतर तो येथे पोचला होता,

Customs officials seize smuggled gold worth Rs 21.78 lakh at Goa's Dabolim airport | कस्टम अधिकाऱ्यांनी गोव्याच्या दाबोळी विमानतळावर पकडले २१ लाख ७८ हजार रुपयांचे तस्करीचे सोने

कस्टम अधिकाऱ्यांनी गोव्याच्या दाबोळी विमानतळावर पकडले २१ लाख ७८ हजार रुपयांचे तस्करीचे सोने

Next

वास्को: हैद्राबादहून गोव्याच्या दाबोळी विमानतळावर उतरलेल्या ‘इंडीगो’ विमानातील एका प्रवाशाकडून कस्टम विभागाने २१ लाख ७८ हजार ४७४ रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले. दाबोळीवर आलेले हे विमान प्रथम दुबईहून कोची, केरळ येथील विमानतळावर उतरले असून नंतर तेथून ते हैद्राबाद ला होऊन गोव्याच्या विमानतळावर आले. दुबईहून तस्करीचे सोने घेऊन प्रथम आलेल्या प्रवाशाला हे विमान कोची - हैद्राबाद ला होऊन गोव्यात येणार असल्याची पूर्वी माहीती असल्याने त्यांने तस्करीचे सोने विमानातच ठेवून तो कोची विमानतळावर उतरला.

दाबोळीवर तस्करीचे सोने घेऊन पकडलेल्या त्या दुसºया इसमाने हे सोने हैद्राबात येथे आपल्या ताब्यात घेतल्यानंतर तो येथे पोचला होता, मात्र येथील जागृत कस्टम अधिकाºयांमुळे हे तस्करीचे सोने बाहेर काढण्याचा त्यांचा बेत फसला.दाबोळीवरील कस्टम अधिकाºयांकडून मिळालेल्या माहीतीनुसार मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. हैद्राबादहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या ‘इंडीगो’ विमानातील एका प्रवाशाला कस्टम अधिकाºयांनी ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एकूण ५१२ ग्राम तुटलेल्या चार सोन्याच्या बिस्कीट आढळल्या.

हे सोने तस्करीचे असल्याचे समजताच ते हैद्राबादहून आलेल्या या विमानातील प्रवाशाशी कसे आले याबाबत अधिकाºयांनी चौकशीला सुरवात केली. हे विमान प्रथम दुबईहून कोची विमानतळावर उतरल्यानंतर तेथून ते हैद्राबादला होऊन नंतर गोव्याच्या दाबोळी विमानतळावर उतरले. अशा प्रकारे हे विमान गोव्यात येणार असल्याची माहीती दुबईहून तस्करीचे सोने घेऊन आलेल्या त्या अज्ञात प्रवाशाला असल्याने त्यांने तस्करीचे सोने कोची विमानतळावर उतरण्यापूर्वी विमानातच लपवून ठेवले. यानंतर हे विमान कोची येथून हैद्राबाद विमानतळावर पोचल्यानंतर तस्करीचे ते सोने विमानात कुठे ठेवले आहे याची माहीती असलेला तो दुसरा प्रवाशी विमानात चढल्यानंतर त्यांने ते सोने स्व:ताच्या ताब्यात घेतले. दाबोळीवर हे विमान पोचल्यानंतर तो प्रवाशी तस्करीचे सोने घेऊन बाहेर पडण्याच्या तयारीत होता, मात्र येथील जागृत कस्टम अधिकाºयांमुळे त्याचा हा बेत फसला.

५१२ ग्राम तस्करीच्या सोन्यासहीत पकडण्यात आलेला तो प्रवाशी मूळ पच्छीम बंगाल येथील असल्याची माहीती कस्टम अधिकाºयांकडून प्राप्त झाली आहे. तसेच तपासणीवेळी त्याच्याशी चार वेगवेगळ््या नावाने आधार कार्ड असल्याचे उघड झाले असून त्याला अटक करण्यात आली आहे. दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाचे सहाय्यक आयुक्त व्हाय.बी. सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली कस्टम अधिकाºयांनी ही कारवाई केली. दुबईहून कोची पर्यंत हे तस्करीचे सोने आणणारा तो पहीला प्रवाशी कोण होता व हे सोने कुठे नेण्यात येणार होते अशा विविध गोष्टीबाबतची चौकशी सद्या चालू आहे.

Web Title: Customs officials seize smuggled gold worth Rs 21.78 lakh at Goa's Dabolim airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.