महिलेचा पाठलाग प्रकरणात आमदार बंधुविरुद्ध गुन्हा
By वासुदेव.पागी | Updated: November 25, 2023 19:07 IST2023-11-25T19:06:28+5:302023-11-25T19:07:15+5:30
आगशी पोलिसानी गुन्हा नोंदविला आहे.

महिलेचा पाठलाग प्रकरणात आमदार बंधुविरुद्ध गुन्हा
वासुदेव पागी, पणजी: महिलेचा पाठलाग करून तिला मारहाण करण्याच्या प्रकरणात सांत आंद्रे. मतदारसंघाचे आमदार विरेश बोरकर यांचा बंधू साईश बोरकर याला आगशी पोलिसानी गुन्हा नोंदविला आहे.
साईश बोरकर याच्या विरुद्ध बेकायदेशीरपणे तक्रारदाराच्या खाजगी मालमत्तेत घुसण्याचा आणि तक्रारदार महिलेशी असभ्य वर्तन करण्याचा दावाही केला आहे. संशयिताने आपला आपल्या घरापर्यंत पाठलाग केला आणि दारावरही ठोकर मारल्याची तक्रार मारिया लिनेटा ग्रासियस यांनी आगशी पोलीस स्थाकात नोंदविली होती.
बोरकर व त्याच्या आणखी एका साथिदाराने मिळून आपल्यासह सहकाऱ्यालाही मारहाण केल्याचे तक्रारदाराने तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीची दखल घेऊन आगशी पोलिसांनी बोरकर याच्या विरुद्ध भारती दंडसंहिता कलम ५०४, ३२३, ५०६ ४४७ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. बोरकर याच्या बरोबर त्याचा मित्र साईश नाईक नावाचा मित्रही आपल्याला मारहाण केलेी जात असताना उपस्थित होता असे तक्रारीत म्हटले होते. त्याच्याविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.