क्रिकेटपटू उपाशी; जीसीएचे सदस्य तुपाशी
By Admin | Updated: July 20, 2014 01:40 IST2014-07-20T01:35:47+5:302014-07-20T01:40:23+5:30
णजी : इंग्लंडसह युरोपच्या दौऱ्यावर जाणाऱ्या गोवा क्रिकेट असोसिएशनच्या सहा सदस्यांचा प्रश्न गाजत असतानाच सध्याच्या व्यवस्थापन मंडळाने

क्रिकेटपटू उपाशी; जीसीएचे सदस्य तुपाशी
णजी : इंग्लंडसह युरोपच्या दौऱ्यावर जाणाऱ्या गोवा क्रिकेट असोसिएशनच्या सहा सदस्यांचा प्रश्न गाजत असतानाच सध्याच्या व्यवस्थापन मंडळाने आॅस्ट्रेलियासह अनेक विदेश दौरे व एकूण प्रवासावर एका वर्षात अडीच ते तीन कोटी रुपये खर्च केले आहेत. आपली सुखे वाढविण्याच्या नादात या मंडळाचे क्रिकेट व स्थानिक खेळाडूंच्या विकासाकडे संपूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
तीन महिन्यांपूर्वी आॅस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेल्या सदस्यांच्या पथकाने २६ लाख रुपयांचा खर्च केला आहे; परंतु गोव्यातील क्रिकेटच्या सुधारणेच्या नावाखाली केलेल्या या दौऱ्याचा
अहवाल नियमाप्रमाणे निबंधकांच्या कार्यालयाला सादर करण्यात
आलेला नाही.
गोवा क्रिकेट असोसिएशनच्या संकुलात वैद्यकीय दालन तयार करण्यात आले असून त्यावर एक लाख ३१ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. कोणताही खर्च २५ हजारांपेक्षा अधिक झाला तर त्याला स्थायी समितीकडून मान्यता मिळवावी लागते. तशी आगाऊ मान्यता वैद्यकीय दालनासाठी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे डॉ. शेखर साळकर व संघटनेचे सरचिटणीस चेतन देसाई यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती. त्या परिणामातून या दालनाचे केवळ दरवाजे काढून टाकण्यात आले; परंतु पुढे कारवाई मात्र झाली नाही.
सांगे येथे उभारण्यात येत असलेले क्रिकेट स्टेडियमही सध्या खर्चावरून वादात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. या मैदानात अजून खूप कामे व्हायची असली तरी जीसीएने त्यावर एक कोटी रुपये खर्च केला आहे. (पान २ वर)