CoronaVirus News: मुरगावात नगरसेवकाचा कोविडने मृत्यू; गोव्यात कोविडचा सातवा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 12:17 IST2020-07-05T12:16:01+5:302020-07-05T12:17:49+5:30
मडगावच्या कोविड रुग्णालयात सुरू होते उपचार

CoronaVirus News: मुरगावात नगरसेवकाचा कोविडने मृत्यू; गोव्यात कोविडचा सातवा बळी
पणजी : गोव्यात कोविडचा सातवा बळी गेला असून मुरगांवचे नगरसेवक पाश्कोल डिसोजा (७२) यांचे मध्यरात्री निधन झाले. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांचे बंधू होत.
पाश्कोल यांना मडगावच्या कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले होते. वास्कोत मांगोर हिल भागात मोठ्या प्रमाणात कोविडची लागण झालेली आहे. गोव्यात आतापर्यंत सहा बळी गेले त्यात खारीवाडा वास्को येथील दोघे तसेच मोर्ले- सत्तरी, फातोर्डा, ताळगांव व कुडतरी येथील प्रत्येकी एक असा समावेश आहे.