Coronavirus : कोलवा बाणावलीत समुद्र किनाऱ्यावरील शेक्स गुंडाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 02:28 PM2020-03-26T14:28:05+5:302020-03-26T14:30:13+5:30

Coronavirus :पर्यटकच नसल्याने एरव्ही लोकांनी ओसंडून वाहणारे गोव्यातील किनारे ओस पडले आहेत

Coronavirus Tourism industry started dismenting shacks SSS | Coronavirus : कोलवा बाणावलीत समुद्र किनाऱ्यावरील शेक्स गुंडाळले

Coronavirus : कोलवा बाणावलीत समुद्र किनाऱ्यावरील शेक्स गुंडाळले

Next

सुशांत कुंकळयेकर

 मडगाव - पर्यटन हंगाम अजूनही संपलेला नसला तरी गोव्यात येणाऱ्या देश विदेशी पर्यटकांचे आकर्षण असलेले शेक्स गुंडाळण्यास व्यावसायिकांनी सुरुवात केली आहे. दक्षिण गोव्यातील कोलवा आणि बाणावली किनाऱ्यावर सध्या हेच चित्र दिसत असून जलक्रीडा व्यवसायिकांनीही आपल्या बोटी किनाऱ्यावर आणल्या आहेत. एव्हढेच नव्हे तर रापण घालून मासेमारी करण्याचे कामही दोन दिवसांपूर्वीच बंद झाले आहे. 

कोलवा येथील जलक्रीडा आयोजक असलेले पेले फेर्नांडिस याना याबद्द विचारले असता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही सगळा व्यवसाय बंद केला आहे. मे महिन्यात स्थिती सुधारली तरच आम्ही जलक्रीडा व्यवसाय सुरू करू पण शेक्स सुरू होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले.

यंदा थॉमस कूक ही कंपनी बंद झाल्याने गोव्यातील पर्यटन व्यवसायावर आधीच परिणाम झाला होता आता त्यातच कोरोनाच्या या फटक्यांची भर पडल्याने या क्षेत्रातील व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. पर्यटकच नसल्याने एरव्ही लोकांनी ओसंडून वाहणारे गोव्यातील किनारे ओस पडले आहेत त्यातच कामगार भीतीमुळे आपल्या गावाला पळून गेल्यामुळे शेक्समध्ये काम करण्यासाठीही कोण नाहीत अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : जगाला कोरोनाचा विळखा! तब्बल 3 अब्ज नागरिक लॉकडाऊन, 21,300 जणांचा मृत्यू

Coronavirus : स्टेट बँकेच्या खातेधारकांसाठी खूशखबर! घरबसल्या मिळणार ‘ही’ सुविधा

Coronavirus : डॉक्टरलाच झाली कोरोनाची लागण, 1000 रुग्णांना संसर्गाचा धोका

Coronavirus : बापरे! फक्त 20 मिनिटांत एका व्यक्तीमुळे 4 जणांना कोरोनाची लागण  

Coronavirus : देशभरातल्या टोलनाक्यांवरील टोलवसुली स्थगित, नितीन गडकरींनी दिला मोठा दिलासा

Coronavirus: धक्कादायक! कोरोनामुळे २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू; वयोवृद्ध, बालकांसह युवकांनाही वाढला धोका

 

Web Title: Coronavirus Tourism industry started dismenting shacks SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.