Coronavirus : 'गोव्याच्या हद्दी सील करा; जिल्हा पंचायत निवडणूक पुढे ढकला'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 02:56 PM2020-03-18T14:56:14+5:302020-03-18T14:58:33+5:30

Coronavirus : कोरोनाची लागण होऊ नये यासाठी दोन व्यक्तींमध्ये एक मीटर अंतर असणे आवश्यक आहे.

Coronavirus seal the border of Goa says vijay sardesai SSS | Coronavirus : 'गोव्याच्या हद्दी सील करा; जिल्हा पंचायत निवडणूक पुढे ढकला'

Coronavirus : 'गोव्याच्या हद्दी सील करा; जिल्हा पंचायत निवडणूक पुढे ढकला'

Next

पणजी - गोव्याच्या हद्दी सील केल्या जाव्यात. अन्य राज्यांतील वाहनांना प्रवेश दिला जाऊ नये त्याचबरोबर आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'कोरोना व्हायरस' प्रतिबंधक उपाययोजना नसतील, तर निवडणुका पुढे ढकला, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.

सरदेसाई म्हणाले की, शेजारी राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, या पार्श्वभूमीवर गोव्याच्या हद्दी सील करायला हव्यात, त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाने येत्या २२ रोजी निवडणुकीच्यावेळी उपाययोजनांची पुरेशी तयारी नसेल तर निवडणुका पुढे ढकलाव्यात. कोरोनाची लागण होऊ नये यासाठी दोन व्यक्तींमध्ये एक मीटर अंतर असणे आवश्यक आहे. मतपत्रिकांद्वारे मतदान होणार असल्याने रबर स्टॅम्प वापरला जाणार आहे. प्रत्येक मतदाराने तो वापरल्यानंतर पुन्हापुन्हा सॅनिटाइझ करण्याची व्यवस्था आहे का? हात स्वच्छ करण्यासाठी व्यवस्था होणार आहे का? आणि ही सगळी जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाला पेलवणार आहे का? आदी सवाल सरदेसाई यांनी केले आहेत.

निवडणुकीच्या दिवशी मतदार केंद्रांवर येणार आहेत. त्यामुळे कोरोनाची साथ पसरू नये, अशी हमी राज्य निवडणूक आयोग देऊ शकत असेल तरच निवडणूक घ्यावी अन्यथा घेऊ नये. सरकारने जनतेच्या आरोग्याशी खेळू नये, राजकारण दूर ठेवावे. सार्वजनिक आरोग्य अति महत्त्वाचे आहे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. शेजारी राज्यांमधून येणारी वाहने रोखण्यासाठी हद्दी सील केल्या जाव्यात, असे सरदेसाई म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus: बापरे! ...तर कोरोनामुळे अमेरिका, ब्रिटनमध्ये 27 लाख लोकांचा मृत्यू होणार?

Coronavirus : ...म्हणून गायीच्या दुधापेक्षा गोमूत्र, शेणाला मिळतोय इतका भाव

Coronavirus: कोरोनाचा संसर्ग वाढला! देशातील रुग्णांची संख्या 147

Coronavirus: एकूण 4 टप्पे! भारतात कोणत्या टप्प्यात आहे 'कोरोना'?, जाणून घ्या  

 

Web Title: Coronavirus seal the border of Goa says vijay sardesai SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.