शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

coronavirus: गोव्यात या महिनाअखेर कोरोनाबाधितांची संख्या पोहोचणार 32 हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 1:37 PM

आतापर्यंत 27 हजार गोमंतकीयांना कोविडची बाधा झाली, या महिन्याच्या दि. 30 र्पयत 32 हजार लोकांना कोविडची बाधा झालेली असेल असा निष्कर्ष आकडेवारीवरून काढता येतो.

पणजी - गोव्यात कोविडग्रस्तांची संख्या ज्या पद्धतीने वाढत आहे, ते पाहता सध्याच्या महिना अखेर्पयत एकूण संख्या 32 हजारार्पयत पोहचणार आहे हे स्पष्ट होत आहे. आतापर्यंत 27 हजार गोमंतकीयांना कोविडची बाधा झाली, या महिन्याच्या दि. 30 र्पयत 32 हजार लोकांना कोविडची बाधा झालेली असेल असा निष्कर्ष आकडेवारीवरून काढता येतो. 27 हजारांपैकी 21 हजार गोमंतकीय कोविडच्या आजारातून ठीक झाले आहेत.राज्यात कोविडच्या आजारातून ठीक होणा-या लोकांचे प्रमाण 77.82 टक्के असे आहे. सहा हजारच्या आसपास सक्रिय रुग्ण गोव्यात आहेत. रोज सहाशे नवे कोविडग्रस्त आढळत आहेत. कधी साडेसहाशेही आढळतात. यावरून सप्टेंबर अखेर्पयत कोविडग्रस्तांची एकूण संख्या 32 हजार असेल हे स्पष्ट होत आहे. दि. 14 सप्टेंबरपर्यंत राज्यात एकूण 24 हजार 898 लोकांना कोविडची बाधा झाली होती व त्यावेळी कोविडवर मात करण्यात यशस्वी झालेल्या लोकांची संख्या 19 हजार 648 होती. त्यादिवशी राज्यभरातील सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजार 946 होती.  दोन दिवसांत ही संख्या वाढली व 16 सप्टेंबर रोजी एकूण कोविडग्रस्तांची संख्या 26 हजार 139 झाली. त्या दिवशी 628 नवे कोविडग्रस्त आढळले होते. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 15 सप्टेंबर रोजी कोविडग्रस्तांची एकूण संख्या 25 हजार 511 होती. 2क् हजार 94 लोक कोविडमधून ठीक झाले होते. 15 रोजी कोविडने अकराजणांचा मृत्यू झाला होता.नव्या 6 हजार लोकांना बाधा होणार दर चोवीस तासांत चारशे कोविडग्रस्त आजारावर मात करण्यात यशस्वी होत आहे. एवढ्य़ा लोकांना कोविड निगा केंद्रातून व इस्पितळातून डिस्चार्ज मिळतो. रोज सरासरी सव्वाचारशे कोविडग्रस्त होम आयसोलेशन स्वीकारतात. दि. 14 ते दि. 17 सप्टेंबर या चार दिवसांत राज्यात नवे 2 हजार 191 कोविडग्रस्त आढळले. एकंदरीत दर चार दिवसांनी सरासरी दोन हजार दोनशे नव्या लोकांना कोविडची बाधा होते. दर चोवीस तासांत पाचशे ते सहाशे कोविडग्रस्त आढळतात. त्यामुळेच गोव्यात अल्पावधीत एकूण पंचवीस हजारांहून जास्त लोकांना कोविडची बाधा झाली. या महिन्याचे आणखी बारा दिवस शिल्लक असून या बारा दिवसांत अंदाजे पाच ते सहा हजार नव्या लोकांना कोविडची बाधा होणार आहे हे आरोग्य खात्याच्या बुलेटिनमधील आकडेवारी अभ्यासल्यास कळून येते.सात शहरी भागांत 2 हजार रुग्ण राज्यातील सात शहरी भागांतील रुग्णालयांच्या क्षेत्रत एकूण दोन हजार शंभर सक्रिय कोविड रुग्ण आहेत. एका साखळी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात कोविडग्रस्तांची संख्या चारशेहून अधिक झाली आहे. मडगाव रुग्णालयाच्या क्षेत्रतही चारशेहून अधिक कोविडग्रस्त आहेत. मडगाव हा पूर्णपणे शहरी भाग आहे. साखळीचे तसे नाही. साखळी हे मिनी शहर असून तेथील रुग्णालयाच्या क्षेत्रात बहुतांश ग्रामीण भाग येतो पण तिथे कोविडग्रस्तांची संख्या मडगावच्याच बरोबरीची आहे ही चिंताजनक गोष्ट आहे. फोंड्य़ाला तीनशे तर पर्वरी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातही तीनशेहून अधिक कोविडग्रस्त आहेत. पर्वरी हे पणजीपासून जवळ असलेले उपनगर आहे तर फोंडा हे शहर आहे. तथापि, दोन्हीकडे कोविडबाधितांची संख्या समान झाली आहे. म्हापसा येथे दोनशे तर पणजीला साडेतीनशे कोविडग्रस्त आहेत. वास्कोला कोविडग्रस्तांची संख्या पुन्हा थोडी वाढली व साडेतीनशे झाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा