शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: महाराष्ट्रासाठी वेगळी प्रक्रिया करण्याचा विचार गोवा सरकारकडून रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 17:04 IST

ख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात येणा-या महाराष्ट्रातील प्रवाशांना यापुढे अधिक कडक व वेगळी प्रक्रिया लागू केली जाईल, असे विधान केले होते.

सदगुरू पाटीलपणजी : महाराष्ट्रातून जे प्रवासी गोव्यात येतात, केवळ त्यांच्यासाठीच वेगळी व जास्त कडक प्रक्रिया गोव्यात लागू करण्याचा विचार अखेर बुधवारी गोवा मंत्रिमंडळाने मागे घेतला. सर्वासाठीच वेगळी प्रक्रिया लागू केली जाईल, केवळ मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील लोकांसाठी नव्हे असे सरकारने बुधवारी स्पष्ट केले. गोव्यात आतापर्यंत कोरोनाचे एकूण 68 रुग्ण सापडले व त्यापैकी 21 रुग्ण उपचारानंतर ठीक झाले व त्यांना इस्पितळातून डिस्चार्ज दिला गेला. मात्र गोव्यातील एकूण कोरोना रुग्णांमध्ये 90 टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात येणा-या महाराष्ट्रातील प्रवाशांना यापुढे अधिक कडक व वेगळी प्रक्रिया लागू केली जाईल, असे विधान केले होते.केंद्रीय रेल्वे मंत्रालयाशी आपले बोलणे सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले होते. मात्र बुधवारी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्यावेळी गोव्यातील कोरोनाविषयक स्थिती, सरकारची उपाययोजना, गोव्यात रोज येणा-या प्रवाशांची संख्या हे सगळे विचारात घेतले गेले. बरीच चर्चा झाली, सर्व मंत्र्यांची मते जाणून घेतली गेली आणि महाराष्ट्रातील लोकांसाठी वेगळी प्रक्रिया नको, सर्वच प्रवाशांसाठी वेगळी व कडक प्रक्रिया लागू करूया असे बैठकीत ठरले.मुख्यमंत्री सावंत यांनी यानंतर पत्रकार परिषदही घेतली व सविस्तर माहिती दिली.गोव्यात देशभरातून रोज चार हजार प्रवासी येतील, असे आम्हाला वाटले होते. प्रत्यक्षात हजार बाराशेच येतात. गोव्यात रेल्वेची संख्या मर्यादित आहे. विमानेही कमी येतात. रोज एक हजार व्यक्तींची चाचणी करण्याची गोव्याची क्षमता आहे, त्यामुळे आम्ही गोव्यात येणा-या प्रत्येकाची कोरोना चाचणी करू. महाराष्ट्रातील प्रवाशांना म्हणून वेगळी प्रक्रिया नसेल. जो प्रवासी नो कोरोना प्रमाणपत्र घेऊन येईल, त्याची चाचणी केली जाणार नाही. अशा प्रकारचे प्रमाणपत्र 48 तास अगोदर प्रयोगशाळेतून घेतलेले असावे. प्रमाणपत्र नसलेल्या प्रत्येक प्रवाशाची चाचणी करू व ती नकारात्मक आली तर त्यास होम क्वारंटाईनचा पर्याय दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :goaगोवा