CoronaVirus Marathi News ten people death due to corona in goa | CoronaVirus News : गोव्यात कोरोनाचा दहावा बळी

CoronaVirus News : गोव्यात कोरोनाचा दहावा बळी

पणजी - गोव्यात शनिवारी कोरोनाचा दहावा बळी गेला आहे. मडगावच्या कोविड रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार घेणार्‍या 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. दक्षिण गोव्यातील मांगोरहील व वास्को हा भाग कोरोनाचे मोठे केंद्र झाला आहे. गेले 40 दिवस मांगोरहीलला कंटेनमेन्ट झोन आहे. 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण दहापैकी पाच व्यक्ती या वास्को व परिसरातील आहेत. यापूर्वी तेथील नगरसेवक पाश्कोल डिसोझा याचाही कोरोनामुळे बळी गेला. गोव्यात दोन हजारहून जास्त कोरोनाग्रस्त आहेत व यापैकी सुमारे 850 सक्रिय रुग्ण आहेत.  एकूण 42 गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यापुढे कोरोडचा फैलाव रोखण्यासाठी लष्कराचीही मदत घेण्याचे सरकारने ठरवले आहे.


 

Web Title: CoronaVirus Marathi News ten people death due to corona in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.