CoronaVirus News : एलईडी मासेमारी करणारे 2 ट्रॉलर पकडले, 29 कामगार क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 16:31 IST2020-05-03T16:25:00+5:302020-05-03T16:31:18+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: सी हॉक आणि ड्रॅगन सी अशी पकडलेल्या ट्रॉलर्सची नावं असून स्थानिक मच्छिमारांनी केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

CoronaVirus News : एलईडी मासेमारी करणारे 2 ट्रॉलर पकडले, 29 कामगार क्वारंटाईन
मडगाव - कर्नाटकच्या हद्दीत जाऊन एलईडी दिव्याचा वापर करून बेकायदेशीर मासेमारी करणारे गोव्यातील दोन ट्रॉलर कर्नाटकातील कोस्ट गार्डने पकडले आहे. त्यावरील 29 कामगारांना ताब्यात घेऊन क्वारंटाईन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पकडलेल्या ट्रॉलर्सची नावे सी हॉक आणि ड्रॅगन सी अशी असून स्थानिक मच्छिमारांनी केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
पहाटे 3 च्या सुमारास एलईडी दिव्यांचा वापर करून दोन ट्रॉलर मासेमारी करत असल्याचे स्थानिक मासेमारांच्या लक्षात आल्यानंतर कोस्ट गार्डना सतर्क करण्यात आले. हे ट्रॉलर पकडून नंतर बैतखोल या बंदरावर आणण्यात आले. या बोटीवर एकूण 29 कामगार होते त्यातील 3 कर्नाटकी तर 26 ओडिशाच्या कामगारांचा समावेश होता. या 29 कामगारांना सध्या क्वारंटईन करून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
भयंकर! BSF जवानाकडून आधी अधिकाऱ्याची हत्या, नंतर केली स्वत: आत्महत्या
बापरे! Reliance Jio च्या लाखो युजर्सचा डेटा ऑनलाईन लीक
CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये इंटरनेट स्लो आहे? असं करा ऑफलाईन Tweet