CoronaVirus News: गोव्यात 292 कोरोना रुग्ण; सत्तरीसह वास्कोलाही लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 21:25 IST2020-06-09T21:24:11+5:302020-06-09T21:25:29+5:30

नवे वाडे तसेच वास्कोत कोरोना रुग्ण आढळले आहेत, त्यांचा मांगोरहीलशी संबंध आला होता.

CoronaVirus goas covid 19 patient toll reaches 292 | CoronaVirus News: गोव्यात 292 कोरोना रुग्ण; सत्तरीसह वास्कोलाही लागण

CoronaVirus News: गोव्यात 292 कोरोना रुग्ण; सत्तरीसह वास्कोलाही लागण

पणजी : राज्यात कोरोनाचे एकूण 29 नवे रुग्ण मंगळवारी आढळले. सत्तरी तालुक्यासह वास्कोलाही कोरोनाची लागण झाली आहे. एकूण 19 आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 292 झाली आहे. हे सगळे इस्पितळात आहेत.
नवे वाडे तसेच वास्कोत कोरोना रुग्ण आढळले आहेत, त्यांचा मांगोरहीलशी संबंध आला होता. सत्तरी तालुक्यातील मोर्ले गावात तसेच मळपण तसेच गुळेली व उसगावमध्ये कोरोना पॉङिाटीव रुग्ण आढळले. हे सगळेजण आरोग्य कर्मचारी म्हणून काम करतात. त्यांचा मांगोरहीलशी संबंध आला होता.

आरोग्य खात्याच्या सचिव निला मोहनन यांची सायंकाळी येथे पत्रकार परिषद झाली. मांगोरहीलला मोहनन यांनी मुख्य सचिवांसोबत मंगळवाही भेटही दिली. मांगोरहीलचा भाग हा अजून आमच्यासाठी खूप चिंताजनक आहे. कोरोना रुग्णांचा ग्राफ तिथे उतरतोय असे आम्ही म्हणत नाही पण संख्या हळूहळू कमी होतेय. जे 29 रुग्ण मंगळवारी आढळले, त्यापैकी बावीसजण हे मांगोरहीलशीसंबंधित आहेत.

विविध गावांतील आरोग्य कर्मचारी जरी कोरोनाग्रस्त आढळले तरी, राज्यात कोविडचा सामाजिक संगर्स सुरू आहे असे म्हणता येणार नाही असे निला मोहनन यांनी सांगितले. मांगोरहीमधील लोकांशी आम्ही मंगळवारी बोललो. तिथे लोकांना ओपीडीची वेळ वाढवून हवी होती. त्यामुळे आज बुधवारपासून सकाळी दहा ते दुपारी एक असे तीन तास ओपीडी चालेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

तो डॉक्टर पॉझिटिव्ह 
जे 29 नवे रुग्ण मंगळवारी आढळले, त्यापैकी सहा आरोग्य कर्मचारी आहेत. सोमवारपर्यंत तेरा आरोग्य कर्मचारी पॉझिटिव्ह  आढळले होते. रस्ता मार्गे मुंबईहून आलेल्या चार व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळल्या. ओरंगाबाद व दिल्लीहून आलेले दोघे प्रवासी कोविड पॉझिटिव्ह  आढळले. शिरोडा येथील कोविड काळजी केंद्रालाही आपण भेट दिली. तिथे 69 असिम्पटोमेटीक व्यक्तींना ठेवले गेले आहे, त्यांना रुग्ण देखील म्हणता येणार नाही असे मोहनन यांनी स्पष्ट केले. मांगोरहीलचा जो डॉक्टर अगोदर कोविद निगेटीव आढळला होता, तो आता कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचेही त्यांनी सांगितले.

दुकाने उघडण्यास नकार 
मांगोरहीलच्या लोकांना रेशन योग्य वेळी मिळत नाही असे नागरिकांनी सांगितले. त्यावर उपाय काढला गेला. मांगोरहीलच्या कंटेनमेन्ट झोनला जो बफर आहे, त्या बफरमधील दुकाने खुली करा अशी मागणी नागरिकांनी केली होती. ती मागणी मान्य करता येत नाही हे नागरिकांना सांगितले गेले, असे मोहनन यांनी स्पष्ट केले. राज्यभरातील कोविड चाचण्यांचे एकूण 1089 अहवाल येणो बाकी आहे.

Web Title: CoronaVirus goas covid 19 patient toll reaches 292

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.