CoronaVirus : गोव्यात कर्फ्यू सात दिवसांनी वाढविला; कॅसिनो, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स, मसाज पार्लर बंदच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 11:01 PM2021-07-25T23:01:05+5:302021-07-25T23:02:32+5:30

CoronaVirus: दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत खुली असतील. कॅसिनो, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स, मसाज पार्लर, करमणूक पार्क, जलसफरी बंद असतील.

CoronaVirus: Curfew extended in Goa after seven days; Casinos, theaters, multiplexes, massage parlors closed | CoronaVirus : गोव्यात कर्फ्यू सात दिवसांनी वाढविला; कॅसिनो, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स, मसाज पार्लर बंदच

CoronaVirus : गोव्यात कर्फ्यू सात दिवसांनी वाढविला; कॅसिनो, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स, मसाज पार्लर बंदच

Next

पणजी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय कर्फ्यू आणखी सात दिवसांनी वाढविण्यात आला आहे. यासंबंधीचा आदेश काल सायंकाळी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी काढला. सोमवार २ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कर्फ्यू जारी असेल.

दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत खुली असतील. कॅसिनो, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स, मसाज पार्लर, करमणूक पार्क, जलसफरी बंद असतील.

राज्यात कोविडचे प्रमाण कमी झाले आहे. शनिवारी कोविड चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्हिटी दर २.४ टक्के होता तसेच कोविडने शनिवारी एकही मृत्यू झालेला नाही. रविवारी कोविडने सहाजणांचा मृत्यू झाला. तर पॉझिटिव्हिटी दर २.१८ टक्के होता.

Web Title: CoronaVirus: Curfew extended in Goa after seven days; Casinos, theaters, multiplexes, massage parlors closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app