शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

coronavirus: गोव्यात कोरोनामुळे 24 तासांत 2 मृत्यू, कोरोनावळींची एकूण संख्या 41 वर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 12:49 PM

मोठ्या संख्येने कोविडग्रस्त आजारातून बरे होत असतानाच ज्यांना मूत्रपिंडाचा किंवा हृदयाचा विकार आहे अशा कोविडग्रस्तांचे मात्र बळी जात आहेत.

पणजी - गोव्यात कोविडमुळे गेल्या 24 तासांत दोन मृत्यू झाले. यामुळे मरण पावलेल्या कोविडग्रस्तांची एकूण संख्या 41 झाली आहे. 62 वर्षीय आणि 71 वर्षीय अशा दोघा इसमांचा मृत्यू झाला आहे. या दोघांनाही मूत्रपिंडाचे विकार होते.गोव्यात गेल्या सहा दिवसांत किमान एक हजार कोविडग्रस्त आजारातून बरे झाले. मोठ्या संख्येने कोविडग्रस्त आजारातून बरे होत असतानाच ज्यांना मूत्रपिंडाचा किंवा हृदयाचा विकार आहे अशा कोविडग्रस्तांचे मात्र बळी जात आहेत.आतार्पयत दक्षिण गोव्यातील मुरगाव तालुक्यातील कोविडग्रस्तांपैकी अनेकांचे बळी गेले. त्यानंतर सासष्टी तालुक्याचा क्रमांक लागतो. एका मुरगाव तालुक्यात सुमारे सातशे कोविडग्रस्त आहेत. जे 41 बळी आतार्पयत गेले, त्यापैकी 85 टक्के व्यक्ती मुरगाव तालुक्यातील आहेत. गुरुवारी जे दोन इसम मरण पावले, त्यापैकी दोघांनाही मूत्रपिंडाचा गंभीर आजार होता पण ते कोविडग्रस्त होते व कोविड इस्पितळात त्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकटा मुरगाव तालुक्यातील तर दुसरा सासष्टी तालुक्यातील आहे.गोव्यात कोविडग्रस्तांची संख्या गेल्या दोन महिन्यांत वाढत गेली. गोवा कधी तरी ग्रीन झोनमध्ये होता हे देखील आता गोमंतकीयांना खरे वाटेनासे झाले आहे. एकूण दीड हजारहून जास्त सक्रिय बाधित कोविडग्रस्त गोव्यात आहेत. साडेपाच हजार लोकांना कोविडची बाधा झाली व त्यापैकी 3 हजार 784 कोविडग्रस्त आजारातून बरे झाले. आतापर्यंत 41 व्यक्तींचा कोविडने बळी घेतल्याने त्याविषयी चिंता व्यक्त होत आहे.  सुमारे पावणे चार हजार कोविडग्रस्त आजारातून बरे झाले ही स्वागतार्ह गोष्ट मानली जात आहे. काल बुधवारी 189 व्यक्ती कोविडच्या आजारातून ब-या झाल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा